WhatsApp ची अद्भूत ट्रिक, स्मार्टफोनची स्क्रीन लॉक असतानाही पाठवा मॅसेज

WhatsApp Amazing Trick: आयफोनवर WhatsApp मॅसेजला रिप्लाय देण्याचा एक मार्ग देखील आहे, जो Android वर नाही.
WhatsApp Amazing Trick
WhatsApp Amazing TrickDainik Gomantak
Published on
Updated on

दिग्गज कंपनी अॅपल आपल्या आयफोन वापरकर्त्यांना अनेक फिचर देण्याचा प्रयत्न करत आहे. आयफोनवर WhatsApp मॅसेजला रिप्लाय देण्याचा एक मार्ग देखील आहे. या फीचरद्वारे तुम्ही आयफोनची स्क्रीन लॉक असतानाही व्हॉट्सअॅप मॅसेजला रिप्लाय देऊ शकता. हे नवीन आणि आश्चर्यकारक फिचर कसे काम करेल हे जाणुन घेऊया. (WhatsApp Amazing Trick News)

व्हॉट्सअॅप (WhatsApp) वरील कोणत्याही मॅसेजला रिप्लाय देण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनची स्क्रीन अनलॉक करावी लागत होती. पण तुम्ही आयफोन वापरकर्ता असाल, तर तुम्ही स्क्रीन लॉक केल्यावर मॅसेजला रिप्लाय देऊ शकता. हे फिचर Apple iPhone 6s आणि iPhone 13, iPhone 12, iPhone 11 या सारख्या नवीन iPhone मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. आपण हे कसे वापरू शकता ते जाणून घेऊया:

WhatsApp Amazing Trick
LIC चा आज 2021-22 साठी आर्थिक निकाल होणार जाहीर; सर्वांची नजर लाभांशावर

1) आयफोनवर आलेल्या मॅसेजला रिप्लाय करण्यासाठी व्हॉट्सअॅप नोटिफिकेशन जास्त वेळ दाबून ठेवा.
2) नंतर मॅसेज टाइप करा आणि सेंड वर क्लिक करा.
3) यासाठी तुम्हाला सेटिंग्जमध्ये जाऊन तुमची हॅप्टिक सेटिंग्ज करावी लागतील. यासाठी Settings मध्ये जा, त्यानंतर accessibility, त्यानंतर touch आणि त्यानंतर haptic touch जाऊन touch duration क्लिक करा.

4) इतकेच नाही तर आयफोन वापरकर्ते सिरीला व्हॉट्सअॅप मॅसेज पाठवायला, व्हॉट्सअॅप कॉल करायला आणि तुमचे मॅसेज मोठ्याने वाचायलाही सांगू शकतात. परंतु हे फिचर फक्त iOS 10.3 मध्येच उपलब्ध आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com