Cryptocurrency Prices: बिटकॉइनची घसरण सुरूच तर पोलकाडोट, लाइटकॉइन ही...

मोठ्या प्रमाणावर तरुणवर्ग यात पैसे टाकत आहे. पण देशाच्या संसदेत मात्र या संदर्भात मात्र साधी चर्चाही झाली नाही.
Cryptocurrency Prices
Cryptocurrency PricesDainik Gomantak
Published on
Updated on

गेल्या 24 तासांत जागतिक क्रिप्टोकरन्सी बाजार कैपिटलाइजेशन हे 2.14 टक्क्यांनी घटून 1.86 ट्रिलियन डॉलरवर आले आहे. तर, ट्रेडिंग वॉल्यूम हे 11.35 टक्क्यांनी घटून 61.44 अब्ज डॉलरवर आले आहे. जिथे डिसेंट्रलाइज्ड फायनांन्स (डी.आय.) 7.11 अब्ज डॉलर्सवर अस्तित्त्वात आहे आणि 24 तासांच्या क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) ट्रेडिंग व्हॉल्यूमच्या 11.58 टक्के आहे. तर, स्टेबलकॉइन 80.37 टक्क्यांसह 49.37 अब्ज डॉलरवर पोहोचले आहेत. बिटकॉइनची बाजारातील उपस्थिती ही 0.31 टक्क्यांनी वाढून 42.60 टक्के झाली आहे. बाजार भांडवलाच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी आज 41,687.64 डॉलरवर ट्रेड करत आहे. (Cryptocurrency Prices)

Cryptocurrency Prices
आता पोस्ट ऑफिसमध्ये काढा आरडी अकाऊंट

रुपयाच्या दृष्टीने बिटकॉइन (Bitcoin) 1.14 टक्क्यांनी घसरून 33,30,681 रुपयांवर ट्रेड करत आहे. तर, इथेरियम 2.22 टक्क्यांनी घसरून 2,27,351 रुपयांवर आला. त्याचबरोबर कार्डानो 3.13 टक्क्यांनी घसरून 81.88 रुपयांवर आला आहे. आणि Avalanche 5.27 टक्क्यांनी घसरून 6,1285.8 रुपयांवर आला आहे.

पोलकाडोट, लाइटकॉइन ही घसरला

पोलकाडोट 3.85 टक्क्यांनी कमी होऊन 1,451.04 रुपयांवर आला आहे. आणि गेल्या २४ तासांत लाइटकॉइन 2.76 टक्क्यांनी घसरून 9,729.4 रुपयांवर पोहोचला आहे. त्याच वेळी, Tether हा 0.2 टक्क्यांनी वाढून 79.71 रुपयांवर पोहोचला आहे.

मेमकॉइन SHIB बद्दल बोलायचे झाले तर त्यात 2.96 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. तर, डोजकॉइनचे भाव 1.68 टक्क्यांनी वधारून 11.68 रुपयांवर ट्रेड करत आहेत. टेरा (एलयूएनए) 1.66 टक्क्यांनी घसरून 4,130.14 रुपयांवर आहे.

दुसरीकडे सोलाना गेल्या 24 तासात क्रिप्टोकरन्सी 4.46 टक्क्यांनी घटून 7,327.73 रुपयांवर आली आहे. एक्सआरपीमध्ये 3.27 टक्क्यांची घसरण झाली आहे. सध्या तो 92.87 रुपयांवर ट्रेड करत आहे. तर, एक्सी 5.77 टक्क्यांनी घसरून 4,463.5 रुपयांवर आली आहे.

क्रिप्टोकरन्सीच्या नियमनासाठी भारतात कायदाच नाही

सरकारने क्रिप्टोकरन्सी अँड रेग्युलेशन ऑफ ऑफ ऑफिशिअल डिजिटल करन्सी बिल, 2021 संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सादर करण्याच्या यादीत घेतले होते. 2022 - 2023 च्या अर्थसंकल्पीय (Budget) अधिवेशनासाठी त्याची यादीही करण्यात आली होती, पण सरकारने त्यावर पुन्हा काम करण्याचा निर्णय घेतल्याने ते सादर होऊ शकले नाही. अलिकडच्या काळात गुंतवणूक म्हणून क्रिप्टोकरन्सी हा लोकांमध्ये एक लोकप्रिय पर्याय म्हणून उदयास आला आहे. विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणावर तरुणवर्ग यात पैसे टाकत आहे. पण देशाच्या संसदेत मात्र या संदर्भात मात्र साधी चर्चाही झाली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com