PM Narendra Modi
PM Narendra ModiDainik Gomantak

PM Modi Video: "देशात काय चालले आहे"?; परदेश दौऱ्यावरून परताच पीएम मोदींची नड्डा यांच्याकडे विचारपूस

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी अनेक नेते विमानतळावर उपस्थित होते. पंतप्रधान मोदींच्या या विदेश दौऱ्यात अनेक ऐतिहासिक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.
Published on

PM Narendra Modi Returns India: पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी रात्री उशिरा परदेश दौऱ्यावरून भारतात परतले. देशात परतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि इतर नेत्यांना भारतात काय चालले आहे, याची विचारपूस केली. यावेळी पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी अनेक नेते विमानतळावर उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींनी जेपी नड्डा यांना भारतात काय चालले आहे, असे विचारले. त्यावेळी नड्डा यांनी त्यांना सांगितले की, पक्षाचे नेते सरकारच्या नऊ वर्षांच्या कामगिरीचे रिपोर्ट कार्ड लोकांपर्यंत पोहोचत आहेत.
मनोज तिवारी, भाजप खासदार
PM Narendra Modi
Law of Sedition: "त्या गुन्ह्यासाठी आता 7 वर्षांची शिक्षा करा"; Law Commision ची सरकारला शिफारस

केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी म्हणाल्या की, पंतप्रधान मोदींचा परदेश दौरा अत्यंत यशस्वी ठरला. या दौऱ्यात पंतप्रधानांना जो काही सन्मान मिळाला तो संपूर्ण देशाचा सन्मान होता. अरब देशांमध्ये इजिप्तचे स्थान मोठे आहे. आणि जेव्हा त्यांनी पंतप्रधानांचा सन्मान केला तो भारतासाठी अभिमानस्पद होता.

पंतप्रधान मोदी सहा दिवसांच्या अमेरिका आणि इजिप्तच्या दौऱ्यानंतर देशात परतले आहेत. या भेटीदरम्यान अनेक ऐतिहासिक करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

दिल्ली विमानतळावर केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी आणि भाजप अध्यक्ष नड्डा यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी हर्षवर्धन, हंस राज हंस आणि गौतम गंभीर यांच्यासह भाजपचे अनेक नेते आणि खासदार उपस्थित होते.

PM Narendra Modi
West Bengal Crime: पत्नी बेपत्ता झाल्याचा केला बनाव; सीआयडीने उलगडला सेप्टिक टँकमधील डाव

तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर इजिप्तच्या त्यांच्या पहिल्या दौऱ्याची झलक दाखवली. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी इजिप्त विमानतळावर उतरताना त्यांच्या भव्य स्वागताची छायाचित्रे आहेत.

पंतप्रधान मोदींनी इजिप्तमध्ये भारतीय वंशाच्या लोकांचीही भेट घेतली. त्यांनी इजिप्तचा दौरा ऐतिहासिक असल्याचे सांगl दोन्ही देशांमधील चांगले संबंध आपल्या देशातील जनतेला लाभदायक ठरतील असे सांगितले. इजिप्तमध्ये पंतप्रधान मोदींना तेथील सर्वोच्च राज्य सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com