Zomatoच्या सहसंस्थापकाचा राजीनामा, शेअर्समध्ये मोठी घसरण

झोमॅटोचे (Zomato) सहसंस्थापक (Co Founder & CEO ) गौरव गुप्ता (Gaurav Gupta) यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Companies Cofounder & CEO Gaurav Gupta quiet Zomato
Companies Cofounder & CEO Gaurav Gupta quiet Zomato Dainik Gomantak

झोमॅटो (Zomato) या कंपनीतुन मोठी बातमी समोर येत आहे. झोमॅटोचे सहसंस्थापक (Co Founder & CEO ) गौरव गुप्ता (Gaurav Gupta) यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 2015 मध्ये झोमॅटोमध्ये सामील झालेल्या गुप्ता यांना 2018 मध्ये कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनवण्यात आले होते. आयपीओसाठी (IPO) ते कंपनीचा चेहरा होते , ज्यामध्ये गुंतवणूकदार आणि माध्यमांशी चर्चेमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका बजावली होती. गौरव गुप्ता झोमॅटो सोडून गेल्याच्या बातमीनंतर कंपनीचे शेअर्स (Zomato Shares) घसरू लागले आहेत. गौरव गुप्ता यांच्या राजीनाम्याच्या बातमीनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये वरच्या स्तरावरून 10 रुपयांपेक्षा जास्त घट झाली आहे. पूर्वी हा स्टॉक 151 रुपयांवर होता आणि आता तो 140 रुपयांवर आला आहे.(Companies Cofounder & CEO Gaurav Gupta quiet Zomato)

Companies Cofounder & CEO Gaurav Gupta quiet Zomato
Banking Stocks ने शेअर बाजार सावरला, सेन्सेक्स 58 हजाराच्या पार

गौरव गुप्तांचा राजीनामा

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संस्थापक दीपेंद्र गोयल आणि सह-संस्थापक गौरव गुप्ता यांच्यात काही वाद झाले आहेत. गौरव गुप्ता यांनी सुरू केलेले जवळपास सर्व व्यवसाय बंद झाले आहेत. गौरव गुप्ता यांनी सुरू केलेला व्यवसाय चांगला प्रदर्शन करत नसल्याचे यामागील मुख्य कारण होते.

झोमॅटोने या सेवा केल्या बंद

अलीकडेच झोमॅटोने किराणा वितरण सेवा आणि न्यूट्रास्युटिकल व्यवसायातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसांनी गुप्ता यांच्या राजीनाम्याची बातमी आली आहे त्यामुळे याचा फटका कंपनीला बसताना दिसत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com