शेअर बाजाराला (Share Market) मंगळवारी चांगली सुरुवात झाली असून सेन्सेक्स (Sensex) अगोदरपेक्षा 193 अंकांनी वाढून 58,482.62 वर उघडला आहे . बँकिंग शेअर्समध्ये (Banking Stock)आज चांगला व्यवसाय दिसून आला. जवळजवळ सर्व बँकिंग शेअर्स (Bank Shares) अर्धा ते एक टक्क्यांनी वाढले असून त्याच वेळी, निफ्टी 50 (Nifty 50) निर्देशांक देखील 50 अंकांच्या वर उघडला.तो 17409 वर व्यवहार करत आहे. (Banking Stocks recovered the stock market, the Sensex crossed 58 thousand)
तथापि, यापूर्वी सोमवारी शेअर बाजारात घसरण झाली होती आणि बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी दोन्ही मोठ्या तोट्याने बंद झाले होते . निर्देशांकात मजबूत भाग असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल) च्या घसरणीचा बाजारावर मोठा परिणाम झालेला पाहायला मिळाला आहे . कंपनीचा स्वस्त स्मार्टफोन लॉन्च होण्यास विलंब झाल्यामुळे स्टॉक खाली आला होता. व्यापाऱ्यांच्या मते, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय दराच्या घसरणीने गुंतवणूकदारांना जोखीम घेण्यापासून दूर ठेवले.
बीएसईच्या 30 शेअर्सचा सेन्सेक्स 127.31 अंक किंवा 0.22 टक्क्यांनी खाली येऊन 58,177.76 वर बंद झाला होता . राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील 13.95 अंक किंवा 0.08 टक्क्यांनी घसरत 17,355.30 वर बंद झाला.
सेन्सेक्सच्या शेअर्समध्ये 2.22 टक्क्यांची घसरण होऊन रिलायन्स इंडस्ट्रीजचा सर्वात मोठा तोटा झाला आहे . कंपनीने गुगलच्या सहकार्याने विकसित होत असलेल्या स्वस्त स्मार्टफोनचे लाँचिंग दिवाळीपर्यंत पुढे ढकलले आहे . यानंतर कंपनीचा शेअर खाली गेला आहे. सेमीकंडक्टरच्या समस्येमुळे हे पाऊल उचलले गेले असावे. जिओ फोन नेक्स्ट गेल्या आठवड्यात 10 सप्टेंबरला सादर करण्याची कंपनीची योजना होती.
याशिवाय ICICI बँक, HUL, HDFC बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक आणि टेक महिंद्रा या कंपन्यांच्या शेअर्समध्ये देखील मोठी घसरण पाहायला मिळाली.
तर दुसरीकडे, टीसीएस, भारती एअरटेल, बजाज फिनसर्व, टाटा स्टील, मारुती आणि कोटक बँक यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.