Bullet Train in India: बुलेट ट्रेनबाबत रेल्वेमंत्र्यांनी दिली महत्त्वाची अपडेट, व्हिडिओ शेअर करत म्हणाले...

Bullet Train in India: भारतात बुलेट ट्रेन धावण्याची वाट पाहणाऱ्यांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.
Bullet Train
Bullet TrainDainik Gomantak
Published on
Updated on

Bullet Train in India: भारतात बुलेट ट्रेन धावण्याची वाट पाहणाऱ्यांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. याबाबतची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. देशात बुलेट ट्रेन धावण्यास उशीर झालेला नाही. त्यासाठी ट्रॅक बनवण्याचे काम सुरु आहे.

गुजरातमधील बिलीमोरा आणि सुरत दरम्यान 50 किलोमीटर लांबीचा ट्रॅक बनवला जात आहे. त्याचे काम ऑगस्ट 2026 मध्ये पूर्ण होईल. तोपर्यंत त्याचा पहिला सेक्शन तयार होईल.

X वर बांधल्या जाणाऱ्या ट्रॅकचा व्हिडिओ शेअर करताना रेल्वेमंत्र्यांनी लिहिले की, बुलेट ट्रेन प्रकल्पाची प्रगती, 21 नोव्हेंबर 2023 पर्यंत 251.40 किलोमीटरचे पिलर. 103.24 किमी एलिव्हेटेड सुपर-स्ट्रक्चर.

दरम्यान, देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणार आहे. हे अंतर 508 किलोमीटर आहे, ज्यामध्ये एकूण 12 स्थानके असतील. त्याचा 352 किमीचा भाग गुजरातमध्ये तर 154 किमीचा पट्टा महाराष्ट्रात (Maharashtra) असेल. या प्रकल्पाचे एकूण बजेट एक लाख कोटींहून अधिक आहे.

बुलेट ट्रेन चालवल्यास अहमदाबादहून मुंबईला पोहोचण्यासाठी फक्त साडेपाच तास लागतील. सध्या या रुटवर 7-8 तास लागतात. या मार्गावरील बुलेट ट्रेनचा वेग ताशी 350 किलोमीटर असेल. त्याचे उद्घाटन 14 सप्टेंबर 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे यांनी केले होते.

Bullet Train
Mumbai To Ahmedabad Bullet Train: बुलेट ट्रेनबाबत बऱ्याच दिवसांनी आली आनंदाची बातमी, रेल्वेमंत्र्यांचा मोठा खुलासा

रेल्वेमंत्री आधी काय म्हणाले?

याआधीही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी बुलेट ट्रेनबाबत वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे, ज्यामध्ये 100 किमी पूल आणि 230 किमी घाटांचा समावेश आहे. बिलीमोरा-सुरत सेक्शन हा त्याचाच एक भाग आहे. देशातील रेल्वे नेटवर्क आणि सेवा सुधारण्यासाठी त्यांनी अनेक योजना जाहीर केल्याचंही त्यांनी सांगितलं.

Bullet Train
Bullet Train: देशातील पहिली बुलेट ट्रेन 2026 मध्ये धावणार! रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा

दुसरीकडे, ओडिशातील बालासोर येथे नुकत्याच झालेल्या रेल्वे अपघातानंतर रेल्वेच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. बालासोर रेल्वे अपघातात सुमारे 300 लोकांचा मृत्यू झाला होता. देशाच्या विविध भागांना रेल्वेच्या माध्यमातून अधिक चांगल्या प्रकारे जोडण्यावर सध्या भर दिला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com