‘Bharat Dal’ Brand: सर्वसामान्यांना मोठा दिलासा, टोमॅटोपाठोपाठ सरकार स्वस्तात डाळ विकणार!

Subsidised Chana Dal: महागड्या टोमॅटोपासून सर्वसामान्यांना दिलासा दिल्यानंतर आता सरकारकडून स्वस्त डाळही मिळणार आहे.
Piyush Goyal
Piyush GoyalDainik Gomantak

Subsidised Chana Dal: महागड्या टोमॅटोपासून सर्वसामान्यांना दिलासा दिल्यानंतर आता सरकारकडून स्वस्त डाळही मिळणार आहे. होय, सरकार जनतेला महागाईपासून दिलासा देण्यासाठी वेगवेगळी पावले उचलत आहे.

केंद्रीय खाद्य आणि ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांनी स्वस्त दरात डाळ उपलब्ध करुन देण्यासाठी 'भारत दाल' ब्रँड अंतर्गत चणा डाळ 60 रुपये प्रति किलो दराने विकण्यास सुरुवात केली.

दिल्ली-एनसीआरमधील नॅशनल अॅग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन (NAFED) च्या रिटेल आउटलेट्समधून चणा डाळ विकली जात आहे.

सफलच्या रिटेल स्टोअरमध्ये डाळ मिळेल

हे NCCF, केंद्रीय भंडार आणि सफलच्या मदर डेअरीच्या रिटेल स्टोअरमध्ये उपलब्ध असेल. अधिकृत निवेदनानुसार, गोयल यांनी 'भारत दाल' या ब्रँड नावाने एक किलो पॅकसाठी 60 रुपये प्रति किलो दराने विक्री सुरु केली आहे.

याशिवाय 30 किलोच्या पॅकसाठी अनुदानित चणा डाळ 55 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध करुन दिली जाईल. सरकारच्या चणा स्टॉकचे चणा डाळीत रुपांतर करुन ग्राहकांना (Customers) परवडणाऱ्या किमतीत डाळ उपलब्ध करुन देण्याच्या दिशेने 'भारत दाल' सुरु करणे हे केंद्राचे मोठे पाऊल असल्याचे सांगण्यात आले.

Piyush Goyal
GST on Online Gaming: जे कोणी करु शकले नाही ते मोदी सरकारने केले, आता होणार तब्बल 20 हजार कोटींचा फायदा!

सहकारी दुकानातूनही वितरण केले जाणार आहे

राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील NCCF, केंद्रीय भांडार आणि सफलच्या रिटेल आउटलेट्स आणि विक्री केंद्रांद्वारे वितरणासाठी NAFED द्वारे चणा डाळीचे मिलिंग आणि पॅकेजिंग केले जाते.

त्यात नमूद करण्यात आले आहे की, या व्यवस्थेअंतर्गत राज्य सरकारांना त्यांच्या कल्याणकारी योजनांसाठी, पोलीस, तुरुंगांतर्गत पुरवठा आणि त्यांच्या ग्राहक सहकारी दुकानांमधून वितरणासाठी चणा डाळ उपलब्ध करुन दिली जाते.

Piyush Goyal
GST 6 Years: मोदी सरकारने लागू केलेल्या जीएसटीला 6 वर्षे पूर्ण, करोडोंचा मिळतोय महसूल, पण...

निवेदनानुसार, भारतामध्ये (India) चणा ही सर्वाधिक उत्पादित डाळ आहे. चन्याचे अनेक पौष्टिक आरोग्य फायदे आहेत. त्यात भरपूर फायबर, लोह, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी, सेलेनियम बीटा कॅरोटीन आणि कोलीन आहे जे मानवी शरीरासाठी अशक्तपणा, रक्तातील साखर, हाडांचे आरोग्य इत्यादी आणि अगदी मानसिक आरोग्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com