भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ने त्यांच्या पंचकुला युनिटसाठी तात्पुरत्या आधारावर प्रकल्प अभियंता आणि प्रशिक्षणार्थी अभियंता पदासाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख 1 जून आहे. स्वारस्य असलेले आणि पात्र उमेदवार BEL च्या अधिकृत वेबसाइट bel-india.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. (BEL Recruitment 2022 applications are invited for project and trainee engineer)
शैक्षणिक पात्रता
या भरतीतून 50 पदे भरली जाणार आहेत. त्यापैकी प्रशिक्षणार्थी अभियंता पदाच्या 38 आणि प्रकल्प अभियंता/अधिकारी यांच्या 17 पदांसाठी भरती घेण्यात आली आहे.
वय मर्यादा
प्रशिक्षणार्थी अभियंता-I पदासाठी उमेदवारांचे कमाल वय 38 वर्षे आणि प्रकल्प अभियंता/अधिकारी-I साठी 32 वर्षे असावे.
अर्ज फी
प्रशिक्षणार्थी अभियंता पदासाठी अर्ज शुल्क 177 रुपये आहे तर प्रकल्प अभियंता पदासाठी अर्ज शुल्क 472 रुपये आहे.
बीईएल भर्ती 2022: अर्ज कसा करावा
- सर्वप्रथम bel-india.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
- मुख्यपृष्ठावरील "करिअर" लिंकवर क्लिक करा.
- 'सूचना' वर क्लिक करा.
- नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या Apply लिंकवर क्लिक करा.
- आता अर्ज भरणे सुरू करा.
- अर्ज फी सबमिट करा.
- आता आवश्यक कागदपत्रे भरणे सुरू करा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.