सोशल मीडियावर पोस्ट करताना रहा सतर्क, नाहीतर मिळणार नाही नोकरी!

आजकाल नोकरीसाठी अर्ज करताना कंपन्या उमेदवारांना त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सची माहिती विचारतात.
Be Carefull while posting on Social Media
Be Carefull while posting on Social MediaDainik Gomantak
Published on
Updated on

Social Media : आजकाल नोकरीसाठी अर्ज करताना कंपन्या उमेदवारांना त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सची माहिती विचारतात. हे आजकाल अगदी सामान्य झाले आहे. पण कंपन्या असे का करतात असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? जाणून घ्या यामागचे कारण काय?

ट्रायडंट ग्रुपच्या मुख्य एचआर ऑफिसर पूजा बी. लुथरा म्हणतात, 'आजच्या काळात कंपन्यांकडून उमेदवारांची 'सोशल मीडिया स्क्रीनिंग' पाहणे सामान्य झाली आहे. लुथरा म्हणाल्या, अनेक कंपन्या सोशल मीडिया पोस्टच्या आधारे उमेदवार नाकारतात. (Be careful when posting on social media, otherwise you will not get the job)

Be Carefull while posting on Social Media
मलायका अरोरासोबत हरनाज संधूने धरला 'छैय्या छैय्या' गाण्यावर ठेका; व्हिडिओ पहा

अशा परिस्थितीत पुढच्या वेळी सोशल मीडियावर (Social Media)पोस्ट टाकण्यापूर्वी सतर्क राहून आक्षेपार्ह असे काही लिहू नका. कोणत्याही कंपनीने केलेल्या स्क्रिनिंगचा हा सामान्य प्रकार आहे. तुम्ही सामान्यतः गुन्हेगारी इतिहास, शिक्षण, नोकरीची पार्श्वभूमी आणि कॉर्पोरेट संस्कृतीशी व्यक्तीचा सुसंवाद पाहता येतो, त्यामुळे नोकरी देण्याआधी उमेदवाराची सोशल मीडिया पार्श्वभूमी पाहिली जाते.

माहितीनुसार, प्रतिष्ठित क्लायंटमध्ये टेलिकॉम, मीडिया, विमा, ग्राहक बँकिंग, स्टाफिंग फर्म, अकाउंटिंग आणि ऑडिट कंपन्या यांचा समावेश आहे. पॉवर आणि गॅस, खाजगी इक्विटी आणि तंत्रज्ञान कंपन्या देखील सोशल मीडिया स्क्रीनिंगवर खूप भर देतात. सामान्यत: कंपन्या उमेदवारांचे लिंक्डइन (Linkedin) आणि ट्विटर (Twitter) प्रोफाइल तपासतात.

परंतु, फेसबुक आणि इंस्टाग्रामला देखील तितकेच महत्व आहे. पदाच्या ज्येष्ठतेनुसार, नियुक्ती करणारे व्यवस्थापक उमेदवारांशी संबंधित सर्व माहितीचे संपूर्ण विश्लेषण करतात. सुशांत द्विवेदी, MD (भारत आणि फिलीपिन्स), टॅलेंट स्क्रिनिंग फर्म SHL, म्हणतात की, वरिष्ठ व्यवस्थापन आणि धोरणात्मक पदांसाठी नियुक्ती करताना ही प्रक्रिया अधिक महत्त्वाची बनते कारण येथे कोणत्याही प्रकारची चूक खूप भारी असू शकते. "जर मी चुकीच्या सीईओची नियुक्ती केली तर ते P&L खाली आणू शकते. यामुळे शेअर्सची किंमत देखील खाली येऊ शकते. एकूणच, याचा मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नोकरीच्या प्रक्रियेमध्ये आपला सोशल मीडिया महत्वाची भूमिका बाजवतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com