Bank New Rule: एक नव्हे आता बँकेत चार नॉमिनी ठेवता येणार, एक नोव्हेंबरपासून लागू होणार नवा नियम; वाचा फायद्याची बातमी

Multiple bank nominees rule: नॉमिनींची घोषणा एकाचवेळी किंवा सोईनुसार करता येणार आहे. यामुळे क्लेमची रक्कम जलद आणि सोप्या पद्धतीने करता येईल, असे मानले जात आहे.
Bank New Rule 2025 – Add Up to Four Nominees in Your Account from November 1
BankingDainik Gomantak
Published on
Updated on

येत्या एक नोव्हेंबरपासून बँकिंगमध्ये मोठा बदल होणार आहे. खातेधारकांना आता चार नॉमिनी म्हणून ठेवता येणार आहेत. यापूर्वी एकच नॉमिनी करता येत होते. नव्या नियमानानुसार चार नॉमिनी करता येणार असल्याने क्लेम लवकर करता येणार आहेत.

नव्या नियमामुळे खातेधारकाच्या नातेवाईंकांना पैसे किंवा संपत्तीचा हक्क मिळणे शक्य होणार आहे. एकापेक्षा अधिक नॉमिनी असल्याने ही प्रक्रिया जलद आणि सोपी होणार आहे. १५ एप्रिल २०२५ रोजी लागू करण्यात आलेल्या बँकिंग क्षेत्राशी निगडीत कयाद्यातील सुधारणेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या नियमानुसार खातेधारकाला चार नॉमिनी करता येणार आहेत.

Bank New Rule 2025 – Add Up to Four Nominees in Your Account from November 1
पोर्तुगीज फुटबॉलपटूसोबत सेल्फीचा मोह भोवला, केरळच्या फॅनला गोव्यात तुरुंगात काढावी लागली रात्र; FC Goa ला होऊ शकतो 8 लाखांचा दंड

नॉमिनींची घोषणा एकाचवेळी किंवा सोईनुसार करता येणार आहे. यामुळे क्लेमची रक्कम जलद आणि सोप्या पद्धतीने करता येईल, असे मानले जात आहे. एकाचवेळी सर्व चार नॉमिनी निश्चित केल्यास त्यांना मिळणाऱ्या क्लेमची ट्क्केवारी देखील नमूद करावी लागणार आहे. ही टक्केवारी शंभरपेक्षा अधिक असणार नाही.

दुसऱ्या प्रकारच्या नॉमिनी पद्धतीत एका नॉमिनीचा मृत्यू झाल्यास दुसऱ्या नॉमिनीचे नाव अग्रक्रमाने घेतले जाईल. यामुळे खातेधारकाला त्याच्या इच्छेनुसार नॉमिनी ठरवता येणार असून, त्यांचा प्राधान्यक्रम देखील निश्चित करता येणार आहे.

Bank New Rule 2025 – Add Up to Four Nominees in Your Account from November 1
Kurnool Bus Fire: खासगी बस आगीत जळून खाक, 20 प्रवाशांचा मृत्य़ू झाल्याची भीती, अनेकजण जखमी; धडकी भरवणारा Video, Photo समोर

अधिक नॉमिनी असल्याचा फायदा कसा होईल?

समजा तुमच्या खात्यात १० लाख रुपये आहेत आणि यासाठी नॉमिनी म्हणून पत्नीचे नाव देण्यात आले आहे. समजा क्लेम करण्यापूर्वीच पत्नीला काही झाल्यास, ही रक्कम कायद्याच्या कचाट्यात अडकून मिळेपर्यंत अधिक वेळ जाऊ शकतो.

पण, अधिक नॉमिनी असल्याने खातेदाराला पत्नी, मुले, आई, भावंडे असे टक्केवारीने नावे निश्चित करता येणार आहेत. नॉमिनीतील कोणाचेही बरेवाईट झाल्यास आपोआप इतरांना अधिकार मिळतील, असा नवा नियम सांगतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com