SBI
SBI Dainik Gomantak

SBI ची मोठी भेट, ग्राहकांना दिले 35 लाख रुपये; जाणून घ्या कसे

SBI Latest Scheme: तुम्हीही SBI चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
Published on

SBI Latest Scheme: तुम्हीही SBI चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI (SBI) ने आपल्या 44 कोटी ग्राहकांना एक अद्भुत भेट दिली आहे. वास्तविक, बँकेने पर्सनल लोन देण्यासाठी एक नवीन सेवा सुरु केली आहे. याअंतर्गत आता ग्राहकांना घरबसल्या सहज लोन मिळणार आहे. 'रिअल टाईम एक्सप्रेस क्रेडिट' नावाच्या या सुविधेसह ग्राहक 35 लाख रुपयांपर्यंतचा लाभ घेऊ शकतात. SBI ने ते YONO अ‍ॅपवर सुरु केले आहे. जाणून घेऊया या खास सुविधेबद्दल...

SBI कडून भेट

SBI 'रिअल टाइम एक्सप्रेस क्रेडिट'च्या या विशेष सुविधेचा लाभ सर्व ग्राहकांना घेता येणार नाही. त्याचा फायदा फक्त केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि संरक्षण सेवेत काम करणाऱ्या ग्राहकांनाच मिळणार आहे, अशा परिस्थितीत तुम्हीही सरकारी कर्मचारी (Employees) असाल तर आता तुम्ही सहजरित्या लोन घेऊ शकाल. ही विशेष सुविधा YONO अ‍ॅपवर उपलब्ध असेल. क्रेडिट तपासणी, पात्रता आणि इतर कागदपत्रांची पडताळणीही घरबसल्या करता येईल.

SBI
SBI, HDFC अन् ICICI बँकेच्या ग्राहकांचे बल्ले-बल्ले, RBI केली मोठी घोषणा

35 लाखांपर्यंतचा फायदा

SBI च्या या सुविधेअंतर्गत तुम्ही 35 लाखांपर्यंतचे लोन घेऊ शकता. या अंतर्गत ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होणार असून क्रेडिट तपासणी, लोनची पात्रता, लोन मंजूरी, कागदपत्रे जमा करणे ही सर्व कामेही ऑनलाइन होतील.

SBI
Fact Check: पॅन नंबर अपडेट न केल्यास SBI खाते ब्लॉक होईल का?

याबाबत सविस्तर माहिती देताना SBI चे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले की, 'योनोवर पात्र पगारदार ग्राहकांसाठी (Customers) रिअल टाइम एक्सप्रेस क्रेडिट कर्ज सुविधा सुरु केल्याने ग्राहकांना मोठा फायदा होईल. Xpress क्रेडिट उत्पादन ग्राहकांना कोणत्याही अडचणीशिवाय डिजिटल मोडद्वारे लोन मिळवण्यास मदत करेल. एसबीआय बँकिंग सुलभ करण्यासाठी ग्राहकांना पूर्णपणे डिजिटल बँकिंग सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com