कामात येऊ शकतो अडथळा, मे महिन्यात बँका 13 दिवस बंद

अन्यथा तुमचा कोणताही मोठा व्यवहार अडकू शकतो
Bank Holiday in May
Bank Holiday in MayDainik Gomantak
Published on
Updated on

मे महिना सुरू झाल्याने रिझर्व्ह बँकेने या महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांचे कॅलेंडर जारी केले आहे. यावेळी तिसरा आणि चौथा शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांसह एकूण 11 दिवस बँका बंद राहणार आहेत. आरबीआयने जारी केलेल्या कॅलेंडरनुसार ईद, भगवान श्री परशुराम जयंती, बसव जयंती, अक्षय्य तृतीया, रवींद्रनाथ टागोर यांचा जन्मदिवस आणि बुद्ध पौर्णिमा यानिमित्ताने या सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. (Bank Holiday in May)

आजकाल नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगचे युग आहे, लोक घरी बसून बँकेचे व्यवहार अगदी सहजतेने पार पाडतात, परंतु कधीकधी अशी कामे होतात ज्यासाठी आपल्याला बँकेच्या शाखेत जावे लागते. जर तुम्ही कोणतेही काम करत असाल ज्यासाठी तुम्हाला बँकेच्या शाखेत जावे लागेल, तर या सुट्ट्यांची काळजी घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे असेल. अन्यथा तुमचा कोणताही मोठा व्यवहार अडकू शकतो.

Bank Holiday in May
जनधन खाते आधारकार्डशी लिंक करायचंय ? जाणून घ्या सोपी पद्धत

मे मध्ये बँक सुट्ट्या

1 मे 2022: रविवारमुळे देशभरातील सर्व बँका बंद राहतील.

2 मे 2022: रमजान-ईद (ईद-उल-फित्र) मुळे कोची आणि तिरुवनंतपुरम बँका बंद राहतील.

3 मे 2022: भगवान श्री परशुराम जयंती/रमजान-ईद (ईद-उल-फित्र)/बसव जयंती/अक्षय तृतीया निमित्त बंद राहील.

4 मे 2022: तेलंगणात ईद-उल-फित्रनिमित्त सर्व बँका बंद राहतील.

8 मे 2022: रविवारमुळे बँका बंद राहतील.

9 मे 2022: पश्चिम बंगालमध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त बँका बंद राहतील.

14 मे 2022: दुसऱ्या शनिवारमुळे बँका बंद राहतील.

15 मे 2022: रविवारमुळे बँका बंद राहतील.

19 मे 2022: बुद्ध पौर्णिमेनिमित्त गुरुवारी बंद राहणार आहे.

22 मे 2022: रविवारमुळे बँका बंद राहतील.

24 मे 2022: काझी नजरुल इस्माल यांच्या वाढदिवसानिमित्त सिक्कीममध्ये सर्व बँका बंद राहतील.

28 मे 2022: चौथ्या शनिवारमुळे बँका बंद राहतील.

29 मे 2022: रविवार असल्यामुळे बँकेला सुट्टी असेल.

राष्ट्रीय आणि प्रादेशिक सण लक्षात घेऊन बँक सुट्ट्या RBI द्वारे निर्धारित केल्या जातात, राष्ट्रीय सुट्ट्या देशभरात लागू केल्या जातात तर राज्यांनुसार प्रादेशिक सुट्ट्या लागू होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com