टेलिकॉम सेक्टरबाबत मोठी अपडेट, अमेरिकेत भारताचा डंका!

Telecom Sector: नुकतीच देशात G20 शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासह जगातील अनेक मोठे नेते सहभागी झाले होते.
PM Modi
PM ModiDainik Gomantak

Telecom Sector: मोदी सरकारच्या काळात भारत विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. देशाच्या विकासाबरोबरच भारताकडून जगाला विकासाचे नवे मार्ग दाखवले जात आहेत.

नुकतीच देशात G20 शिखर परिषद आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासह जगातील अनेक मोठे नेते सहभागी झाले होते.

यादरम्यान दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारताच्या दूरसंचार सेक्टरबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. आता भारताच्या दूरसंचार क्षेत्राची व्याप्ती आणखी वाढणार आहे.

दूरसंचार क्षेत्र

दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, G20 दरम्यान अनेक द्विपक्षीय चर्चा झाल्या. यामध्ये अनेक महत्त्वाचे करारही झाले. दूरसंचार क्षेत्रातील भारताच्या डिझाइन आणि उत्पादित उपकरणांना अमेरिकेच्या (America) रिप अँड रिप्लेस प्रोग्राममध्ये मान्यता देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात भारताला त्याचा फायदा मिळू शकतो.

PM Modi
Banking Sector in India: आर्थिक मंदीच्या काळात भारतीय बँकांची विश्वासार्हता कायम, 'हा' किर्तीमान...

निर्यातीत वाढ होऊ शकते

यामुळे आज भारत (India) सुमारे 6000 कोटी रुपयांची निर्यात करत आहे आणि येत्या काळात त्यात वाढ होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय दूरसंचार उपकरणे अतिशय चांगल्या दर्जाची असून अमेरिकेसारख्या मोठ्या बाजारपेठेत त्यांना स्थान मिळेल. अशा प्रकारे अनेक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या, ज्यामुळे नवीन संधी निर्माण होतील.

PM Modi
7th Pay Commission DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांची होणार निराशा, एवढ्या टक्क्यांनी DA वाढणार!

रिप आणि रिप्लेस प्रोग्राम

2020 मध्ये अमेरिकेत रिप अँड रिप्लेस प्रोग्रामची सुरुवात झाली. याअंतर्गत अनेक महत्त्वाची पावले उचलण्यात आली. दूरसंचार क्षेत्राशी संबंधित उपकरणे अमेरिकन कंपन्यांनी चीनी कंपन्यांच्या Huawei आणि ZTE मार्फत उत्पादित केली.

मात्र त्यांना अमेरिकेने बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर अमेरिकेने चीनवर कमर्शियल सीक्रेट चोरल्याचा आरोप केला. आता त्याचा फायदा भारताला होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com