Indian Railways: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. सरकार आता प्रवाशांसाठी मोठे पाऊल उचलण्याच्या विचारात आहे. वास्तविक, कोरोना संकटानंतर रेल्वेने बरेच बदल केले आहेत. आतापर्यंत, कोरोना संकटापूर्वी रेल्वेमध्ये प्रवाशांना उपलब्ध असलेल्या अनेक सवलती पुन्हा सुरु करण्यात आल्या नव्हत्या, त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही कमी झाली होती.
प्रीमियम गाड्यांचे भाडे कमी होणार!
आता प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी राजधानी, शताब्दी आणि दुरंतो सारख्या प्रीमियम गाड्यांमधील डायनॅमिक भाडे काढून टाकण्याचा विचार रेल्वे करत आहे. रेल्वेमंत्र्यांनी यासंबंधीची माहिती दिली. रेल्वेमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला की, नकारात्मक प्रतिसाद आणि प्रवाशांची घटलेली संख्या पाहता सरकार डायनॅमिक भाडेप्रणाली मागे घेण्याचा विचार करत आहे का? याला उत्तर देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnav) यांनी सांगितले की, सध्या सरकारचे (Government) फ्लेक्सी फेयर पॉलिसी मागे घेण्याची कोणतीही योजना नाही.
अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली
रेल्वे मंत्री पुढे म्हणाले, "रेल्वे डायनॅमिक फेअर सिस्टीम ही अशी प्रणाली आहे, ज्यामध्ये मागणीनुसार भाडे निश्चित केले जाते. या अंतर्गत 10 टक्के जागांच्या बुकिंगसह, भाडे 10 टक्क्यांनी वाढते. जागांची संख्या कमी झाली की भाडे वाढते. तथापि, हे सर्व प्रकारच्या गाड्यांना लागू नाही. ही व्यवस्था 9 सप्टेंबर 2016 रोजी राजधानी, शताब्दी आणि दुरंतो या गाड्यांमध्ये लागू करण्यात आली होती.'' परंतु आता अनेक मार्गांवरील रेल्वेचे भाडे विमानापेक्षा महाग झाले आहे. त्यामुळे वेळ आणि पैसा या दोन्हीत किफायतशीर असल्याने लोक विमानाने प्रवास करु लागले आहेत, त्यामुळे रेल्वे (Railway) प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे.
रेल्वे प्रवाशांच्या संख्येत घट
रेल्वेमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनापूर्वीच्या काळात फ्लेक्सी फेयर पॉलिसीमध्ये पॅसेंजर आणि ट्रेनमधून मिळणारी कमाई नॉन फ्लेक्सीपेक्षा जास्त होती, परंतु तरीही हे धोरण मागे घेण्याबाबत सरकारला कोणताही विचार करत नाही.
रेल्वेमंत्री पुढे म्हणाले, 'रेल्वे आणि विमानसेवा या वाहतुकीच्या (Transport) दोन वेगळ्या पद्धती आहेत. त्यांची तुलना व्हॉल्यूम, कनेक्टिव्हिटी आणि सोयीच्या बाबतीत होऊ शकत नाही. विमान कंपन्यांमध्ये कमाल भाडे मर्यादा नाही तर रेल्वेने संपूर्ण वर्षासाठी कमाल भाडे निश्चित केले आहे. विमान कंपन्यांचे भाडे अनेक घटकांवर अवलंबून असते. रेल्वेचे भाडे विमान कंपनीपेक्षा कमी किंवा जास्त असू शकते. तुम्ही कोणत्या क्लासमधून प्रवास करत आहात यावर ते अवलंबून आहे. रेल्वेने प्रवास करायचा की एअरलाइन्सने (Airlines) प्रवास करायचा हे प्रवाशांनी ठरवायचे आहे.'
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.