10 मार्चनंतर पेट्रोल-डिझेल दराचा भडका उडण्याची शक्यता

10 मार्चनंतर निवडणुकांचा निकाल लागताच पेट्रोल-डिझेल दराचा भडका उडण्याची शक्यता
Petrol-Diesel Price
Petrol-Diesel PriceDainik Gomantak
Published on
Updated on

1March 2022 : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची धार अधिक तीव्र झाली असून जगातील इतर देश हे युद्ध थांबावे यासाठी प्रयत्न करत आहेत. तर या युद्धामुळे जगाला महागाईची झळ जानवत आहे. त्यातच रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले असून जगाची चिंता वाढली आहे. मात्र आपल्या देशात याचे परिणाम म्हणावे तितके दिसत नाहीत. याचे कारण देशात झालेल्या पाचही राज्यांतील विधानसभा निवडणुका. या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा 10 मार्च रोजी जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे इतके दिवस पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel Rates) स्थिर असणारे दर वाढण्याची शक्यता आहे. (Petrol-diesel rates likely to go up after March 10)

Petrol-Diesel Price
Punjab Weather Update: पंजाबमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता

राष्ट्रीय बाजारात (national market) गेल्या चार महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर (Fuel Price) स्थिर असल्याने. देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते. देशात निवडणुकांमुळे पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्याचं बोललं जात आहे. मात्र तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, 10 मार्च रोजी या निवडणुकांचा निकाल जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे 10 मार्चपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. मात्र त्यानंतर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या (Diesel) किमतींमध्ये मोठी वाढ होऊ शकते.

देशात 4 नोव्हेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. केंद्र सरकारनं पेट्रोलच्या उत्पादन शुल्कावर 5 रुपये आणि डिझेलवर 10 रुपये प्रति लिटर घट केली होती. त्यानंतर देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या खाली आलं होतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com