iPhone Apple इव्हेंट थेट येथे पाहू शकता, वाचा एका क्लिकवर

Apple iPhone 14 Series Launch Event: आयफोन 14 सिरीज आज लॉन्च होणार आहे.
Apple iPhone 14 Launch Event
Apple iPhone 14 Launch EventDainik Gomantak
Published on
Updated on

iPhone 14 आज म्हणजेच 7 सप्टेंबरला लॉन्च होणार आहे. या कार्यक्रमात कंपनी अनेक मोठ्या प्रोडक्टचे अनावरण करणार आहे. आयफोन 14 सीरीजसोबत कंपनी नेक्स्ट जनरेशन स्मार्ट वॉच देखील लॉन्च करणार आहे. अनेक हँडसेट आयफोन 14 सीरीज अंतर्गत येतील. यामध्ये iPhone 14, iPhone 14 Pro, iPhone 14 Max आणि iPhone 14 Pro Max यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, Apple Apple Watch Series 8, Watch Pro आणि AirPods Pro 2 देखील लॉन्च होणार आहे. तुम्ही हा कार्यक्रम केव्हा आणि कुठे लाइव्ह पाहू शकाल याची सर्व माहिती जाणून घेउया.

येथे पाहा Live Event

Apple Far Out Event आज रात्री 10:30 वाजता सुरू होईल. हा कार्यक्रम Apple च्या YouTube चॅनेलवर किंवा कंपनीच्या इव्हेंट पेजवर थेट प्रक्षेपित केला जाईल. याशिवाय अॅपल टीव्हीवरही हा कार्यक्रम पाहता येईल.

यामध्ये कंपनी iPhone 14 सीरीज लॉन्च करणार आहे. कंपनी या सीरीज अंतर्गत iPhone 14, iPhone 14 Max, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max फोन आणू शकते. याशिवाय, नेक्स्ट जनरेशन स्मार्ट वॉच ऍपल वॉच सीरीज 8 आणि वॉच प्रो देखील सादर केले जातील. यासोबतच या इव्हेंटमध्ये Apple AirPods Pro 2 देखील दाखवला जाईल.

Apple iPhone 14 Launch Event
प्रतीक्षेचे तास संपले! IPhone 14 Series सह 'हे' प्रोडक्ट्स होणार लॉन्च; जाणून घ्या किमती

लॉन्च होण्यापूर्वीच या मालिकेचे खास स्पेसिफिकेशन समोर आले आहे. Apple iPhone 14 सीरीज अंतर्गत येणारे iPhone 14 आणि iPhone 14 Max समान डिझाइनसह आणले जातील. आयफोन 14 प्रो आणि आयफोन 14 प्रो मॅक्स समान डिझाइन आणि अनेक समान वैशिष्ट्यांसह लॉन्च केले जाऊ शकतात.

काही वेळापूर्वी आलेल्या लीक्सनुसार, iPhone 14 Pro मध्ये 2 कटआउट्स उपलब्ध असतील. iPhone 14 आणि iPhone 14 Pro मध्ये 6.1-इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो. त्याच वेळी, iPhone 14 Pro Max आणि iPhone 14 Max ला 6.7-इंच स्क्रीन मिळण्याची अपेक्षा आहे. iPhone 14 Apple A15 Bionic चिपसेटसह लॉन्च होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com