Apple 'Far out' Launch Event Updates: Apple इव्हेंट अवघ्या काही तासांत सुरु होणार आहे. 7 सप्टेंबर रोजी होणाऱ्या या विशेष कार्यक्रमात कंपनी आपली दमदार प्रोडक्ट्स सादर करणार आहे. अॅपलचे चाहते आयफोन 14 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. iPhone 14 सोबत, कंपनी AirPods Pro, Watch 8 Series, Watch Pro, iPad 10th Gen असे अनेक प्रोडक्ट लॉन्च करु शकते. आयफोन 14 सीरीजच्या आतापर्यंत लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार, नवीन आयफोन सीरीजमध्ये पंच-होल डिझाइनसह डिस्प्ले मिळू शकतो.
दरम्यान, iPhone 14 सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी सपोर्टसह येईल. याशिवाय 14 सीरीजमधील कॅमेरा बॅटरी फीचर्समध्येही अपडेट्स पाहिले जाऊ शकतात. त्याच वेळी, iPhone 14 मालिकेत iPhone 14, iPhone 14 Pro, iPhone 14 Pro Max, iPhone 14 Pro plus समाविष्ट होऊ शकतो.
अॅपल इव्हेंट कुठे पाहू शकतो?
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अॅपलचा इव्हेंट कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनो येथील अॅपल पार्क येथे आयोजित करण्यात आला आहे. हा इव्हेंट भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता सुरु होईल. अॅपलच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, यूट्यूब चॅनल आणि वेबसाइटवर हा इव्हेंट थेट प्रक्षेपित केला जाईल.
आयफोन 14 सीरीज
यावेळी, अॅपलचे सर्वाधिक फोकस आयफोन 14 सीरिजवर असेल. यावेळी अॅपल कंपनी आपले 5 मॉडेल सादर करणार आहे. यामध्ये iPhone 14, iPhone 14 Mini, iPhone 14 Pro, iPhone 14 Max/Plus आणि iPhone 14 Pro Max/Plus यांचा समावेश आहे.
दुसरीकडे, अॅपलचा सर्वाधिक फोकस आयफोन 14 सीरिजवर असेल. यावेळी अॅपल कंपनी आपले 5 मॉडेल सादर करणार आहे. यामध्ये iPhone 14, iPhone 14 Mini, iPhone 14 Pro, iPhone 14 Max/Plus आणि iPhone 14 Pro Max/Plus यांचा समावेश आहे. A15 बायोनिक चिपसेट iPhone 14, iPhone 14 Mini आणि iPhone 14 Max/Plus मध्ये वापरला जाईल. त्याच वेळी, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max/ Plus नवीन A16 Bionic चिपसेटसह येऊ शकतात.
आयफोन 14 सीरीजचा डिस्प्ले कसा असेल
iPhone 14 Mini 5.4 इंच डिस्प्लेसह, iPhone 14 आणि iPhone 14 Pro 6.1 इंच डिस्प्लेसह देऊ शकतो. याशिवाय iPhone 14 Max आणि iPhone Pro Max मध्ये 6.7-इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो. आयफोन 14 सीरीजच्या कॅमेरा फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, त्याच्या प्रो मॉडेल्समध्ये 48MP प्रायमरी कॅमेरा आढळू शकतो.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.