Apple च्या iPhone 14 लाँचची तारीख जाहीर

Apple iPhone 14 Launch Date: आयफोन व्यतिरिक्त कंपनी या इव्हेंटमध्ये इतर प्रोडक्ट देखील लाँच करणार आहे.
Apple iPhone 14 Launch Date
Apple iPhone 14 Launch DateDainik Gomantak

अॅपल (Apple) ने आपल्या आगामी इव्हेंटची तारीख जाहीर केली आहे. या इव्हेंटमध्ये iPhone 14 सीरीज लाँच होणार आहे. अॅपलचा इव्हेंट 7 सप्टेंबर रोजी होणार आहे. कंपनीने आपले आमंत्रण शेअर केले आहे. आयफोन आणि अॅपल वॉच या कार्यक्रमात लाँच होणार आहेत. अॅपल इव्हेंटसाठी कंपनीने फार आऊट टॅग लाइन वापरली आहे.

इव्हेंटमध्ये, iPhone 14 सिरीजसह नवीन Apple Watch, iPad टॅब्लेट आणि इतर प्रोडक्ट पाहता येणार आहे. कंपनी यासोबत iOS 16 आणि वॉच OS 9 ची घोषणा करण्याची शक्यता आहे.

7 सप्टेंबर रोजी होणाऱ्या या इव्हेंटचे खास आकर्षण म्हणजे iPhone 14 सिरीज आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनी या सीरिजमध्ये चार आयफोन लाँच करू शकते. यामध्ये iPhone 14, iPhone 14 Max, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max यांचा समावेश असू शकतो. कंपनीने आयफोन 12 आणि 13 सीरीजसह मिनी व्हर्जन लाँच केले.

Apple iPhone 14 Launch Date
Starbucks New CEO: भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिंहन स्टारबक्सचे नवीन CEO

आयफोन व्यतिरिक्त कंपनी या इव्हेंटमध्ये इतर प्रोडक्ट देखील लाँच करणार आहे. यामध्ये iPad 10.2 (10th जनरेशन), iPad Pro 12.9 (6th जनरेशन) आणि iPad Pro 11 (4th जनरेशन) लाँच केले जाऊ शकतात. Apple A14 चिपसेट आणि USB Type-C पोर्ट लो-एंड iPad मॉडेल्समध्ये दिसतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com