Apple चे CEO टिम कुक यांनी घेतली PM मोदींची भेट, गुंतवणुकीची केली मोठी घोषणा!

Apple CEO Tim Cook Met Prime Minister Narendra Modi: अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी बुधवारी संध्याकाळी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
Apple CEO Tim Cook Met Prime Minister Narendra Modi
Apple CEO Tim Cook Met Prime Minister Narendra ModiDainik Gomantak

Apple CEO Tim Cook Met Prime Minister Narendra Modi: अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी बुधवारी संध्याकाळी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी टीम कुक यांचे स्वागत केले.

या भेटीदरम्यान त्यांच्यात सध्याच्या युगात तंत्रज्ञानाच्या विस्तारावर चर्चा झाली. टीम कुक यांनी पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतरचा फोटो शेअर केला आहे.

टीम कुक यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, हार्दिक स्वागतासाठी मोदीजींचे आभार. आम्ही दोघांनीही भविष्यात तंत्रज्ञानाच्या (Technology) सकारात्मक परिणामांबद्दलची दृष्टी सामायिक केली. शिक्षण, विकासकांपासून उत्पादन आणि पर्यावरणापर्यंत गुंतवणूक वाढवण्यासाठी वचनबद्ध.'

Apple CEO Tim Cook Met Prime Minister Narendra Modi
Apple's First Store In India: अ‍ॅपलच्या भारतातील पहिल्या रिटेल स्टोअरचे मुंबईत ग्रॅण्ड ओपनिंग , टिम कुककडून ग्राहकांचे Welcome, पाहा व्हिडिओ

पीएम मोदींनी या शैलीत उत्तर दिले

पंतप्रधान मोदींनीही टीम कुक यांच्या ट्विटला उत्तर दिले. टीम कुक यांना भेटून आनंद झाला, असे पंतप्रधान म्हणाले. विविध विषयांवर विचारांची देवाणघेवाण करताना आणि भारतात (India) होत असलेल्या तंत्रज्ञान-आधारित बदलांवर प्रकाश टाकताना आनंद झाला, असेही पंतप्रधान म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधानांना भेटण्यापूर्वी अॅपलच्या सीईओने केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. टीम कुक यांनी भारतातील आयफोन निर्मिती, इलेक्ट्रॉनिक्स निर्यात, अॅपची अर्थव्यवस्था आणि विशेषतः महिलांसाठी रोजगाराच्या समस्यांवर चर्चा केली.

Apple CEO Tim Cook Met Prime Minister Narendra Modi
Apple iOS: Apple यूजर्ससाठी आनंदाची बातमी! रिलीज झाले iOS 16.2 अपडेट

दुसरे स्टोअर दिल्लीत उघडण्यात येणार

मुंबईनंतर अॅपल आता दिल्लीतही स्टोअर उघडणार आहे. हे सिलेक्ट सिटीवॉक मॉल, साकेत, दिल्ली येथे सुरु होत आहे. टीम कुक उद्या साकेत येथील सिलेक्ट सिटी मॉलमध्ये स्टोअरच्या उद्घाटनाच्या वेळी ग्राहकांचे स्वागत करणार आहे.

काल, टिम कुक यांनी मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे Apple चे पहिले अधिकृत स्टोअर लॉन्च केले. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड ड्राइव्ह येथे उघडलेल्या अॅपल स्टोअरपेक्षा साकेत स्टोअर लहान आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com