Apple iOS Update: भारतीय यूजर्संना Apple एक आनंदाची बातमी दिली आहे. iOS 16.2 हे नवीन अपडेट आहे, जेणेकरुन यूजर्स 5G सेवेचा लाभ घेऊ शकतील. यासाठी आयफोन यूजर्सना त्यांचा फोन iOS 16.2 OS सह अपडेट करावा लागेल. (Apple iPhone 5G सपोर्ट) नवीन अपडेटमुळे यूजर्संना केवळ 5G सपोर्ट मिळणार नाही, तर त्यांना सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीची सुविधाही मिळणार आहे.
दरम्यान, या नवीन अपडेटनंतर, iPhone 12 Series, iPhone 13 Series आणि iPhone 14 सिरीजसह अनेक मॉडेल्समध्ये 5G सेवा सहज उपलब्ध होऊ शकते. एअरटेल आणि रिलायन्स जिओने भारतातील (India) अनेक शहरांमध्ये 5G सेवा सुरु केली आहे.
दुसरीकडे, आयफोनमध्ये iOS 16.2 वर अपडेट केल्यानंतर, यूजर्स फ्रीफॉर्म अॅप देखील वापरु शकतील, जे या वर्षी आयोजित वर्ल्ड वाइड डेव्हलपर कॉन्फरन्स (WWDC) दरम्यान सादर केले गेले आहे. या नवीनतम अपडेटच्या मदतीने, यूजर्संना (User) या अपडेटचा लाभ घेता येईल.
अॅपलच्या या मॉडेल्समध्ये आला 5G सपोर्ट, पहा संपूर्ण यादी
iPhone SE (3री जनरेशन)
आयफोन 12 मिनी
आयफोन 13 मिनी
आयफोन 12
आयफोन 13
आयफोन 14
iPhone 14 Max
आयफोन 12 प्रो
आयफोन 13 प्रो
आयफोन 14 प्रो
iPhone 12 Pro Max
iPhone 13 Pro Max
iPhone 14 Pro Max
iOS 16.2 च्या अपडेटनंतर नवीन फीचर्स उपलब्ध होतील
Apple iOS 16.2 वरुन अपडेट केल्यानंतर, यूजर्संना फ्रीफॉर्म अॅप व्यतिरिक्त अनेक नवीन फिचर्स पाहायला मिळतील. फ्रीफॉर्म अॅपच्या मदतीने मॅक, आयपॅड आणि आयफोन चालवणारे यूजर्स एकत्र काम करु शकतील. यामध्ये एक्सटर्नल डिस्प्लेलाही सपोर्ट करता येईल. यामध्ये अॅपल म्युझिक सिंग आणि गेम सेंटर सारखे फीचर्स देखील उपलब्ध असतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.