

Amul Milk Price Hike November 2026: महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला आजपासून (12 नोव्हेंबर) पुन्हा एकदा मोठी कात्री लागणार असून, देशातील अग्रगण्य डेअरी कंपनी गुजरात सहकारी दुग्ध विपणन महासंघाने आपल्या लोकप्रिय 'अमूल' ब्रँडच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन ते चार रुपयांची मोठी वाढ करण्याची घोषणा केली. आजपासून देशभरात दुधाचे हे नवे दर लागू करण्यात आले.
बुधवारी कंपनीने या दरवाढीची माहिती देताना स्पष्ट केले की, दुधाच्या (Milk) उत्पादनासाठी येणारा खर्च प्रचंड वाढल्याने नाइलाजाने हा निर्णय घ्यावा लागला. या नवीन दरानुसार ग्राहकांच्या सर्वाधिक पसंतीच्या अमूल ताजा टोन्ड दुधासाठी आता प्रतिलिटर दोन रुपये अधिक मोजावे लागतील, तर अमूल गोल्ड दुधाच्या किमतीत थेट चार रुपयांची वाढ झाली. यापूर्वी कंपनीने याच वर्षी मे महिन्यात दुधाचे दर वाढवले होते, त्यानंतर काही महिन्यांतच ही दुसरी मोठी दरवाढ करण्यात आली.
दुधाच्या किमती वाढवण्यामागे कंपनीने हवामान आणि कच्च्या मालाच्या वाढत्या खर्चाचे कारण दिले. यंदा गुजरातसह देशातील अनेक भागांत झालेल्या कमी आणि अनियमित पावसामुळे हिरवा आणि सुका चारा, पेंड, मका यांसारख्या पशुखाद्याच्या दरात मोठी वाढ झाली. याशिवाय दुधाच्या पॅकेजिंगसाठी लागणारे साहित्य आणि इंधनाच्या किमती वाढल्याने प्रक्रियेचा खर्चही आवाक्याबाहेर गेला. अशा आव्हानात्मक परिस्थितीत सुमारे 36 लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा आणि त्यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन मिळावे, या हेतूने ही दरवाढ केल्याचे जीसीएमएमएफने म्हटले.
अमूलच्या सहकारी तत्त्वानुसार ग्राहकांकडून मिळणाऱ्या उत्पन्नाचा 80 टक्के वाटा थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिला जातो. विशेष म्हणजे, अमूलच्या आधी बुधवारी सकाळी मदर डेअरीनेही आपल्या दुधाचे दर वाढवण्याची घोषणा केली होती, ज्याची अंमलबजावणीही आज गुरुवारपासूनच सुरु झाली. एकाच वेळी दोन मोठ्या कंपन्यांनी दुधाचे दर वाढवल्याने सर्वसामान्यांचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडण्याची चिन्हे आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.