विमान प्रवास महागणार, जेट इंधनात मोठी दरवाढ, जाणून घ्या आजचे भाव

जेट इंधनाची किंमत 277 रुपयांनी वाढून 113202.33 रुपये प्रति किलोलिटर झाली आहे.
Air travel will become more expensive big increase in jet fuel find out todays prices
Air travel will become more expensive big increase in jet fuel find out todays pricesDainik Gomantak
Published on
Updated on

पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel price) दरात आज सलग 11व्या दिवशी कोणतीही वाढ झालेली नाही. मात्र, जेट इंधनाच्या (Jet Fuel Price) दरात वाढ झाली आहे. जेट इंधनाची किंमत 277 रुपयांनी वाढून 113202.33 रुपये प्रति किलोलिटर झाली आहे. 16 एप्रिलपासून कोलकात्यात नवीन किंमत 117753.60 रुपये प्रति किलोलीटर, मुंबईत 117981.99 रुपये आणि चेन्नईमध्ये 116933.49 रुपये प्रति किलोलीटर झाली आहे. (Air travel will become more expensive, big increase in jet fuel)

या तेजीनंतर देशातील जेट इंधनाच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढीमुळे एटीएफ म्हणजेच एअर टर्बाइन इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. यापूर्वी 1 एप्रिल रोजी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत जेट इंधन ( ATF) ची किंमत 2 टक्क्यांनी वाढून 112925 रुपये प्रति किलोलीटर झाली होती.

आंतरराष्ट्रीय उड्डाण करणाऱ्या देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी राजधानी दिल्लीत ATF ची किंमत प्रति किलोलिटर 1130.88 इतकी वाढली आहे. कोलकात्यात, ही किंमत प्रति किलोलिटर $1171.06, मुंबईत $1127.36 प्रति किलोलीटर आणि चेन्नईमध्ये $1126 प्रति किलोलीटर झाली आहे.

1 एप्रिलला तेजी

यापूर्वी 1 एप्रिल रोजी जेट इंधनाच्या किमतीत वाढ झाली होती. 1 एप्रिल रोजी राजधानी दिल्लीत जेट इंधन म्हणजेच ATF ची किंमत 2 टक्क्यांनी वाढून 112925 रुपये प्रति किलोलीटर झाली होती. यापूर्वी ही किंमत 110666 रुपये प्रति किलोलीटर होती. बेंचमार्क इंधनाच्या सरासरी आंतरराष्ट्रीय किमतीच्या आधारावर प्रत्येक महिन्याच्या 1 आणि 16 तारखेला जेट इंधनाच्या किमती सुधारित केल्या जातात.

Air travel will become more expensive big increase in jet fuel find out todays prices
Air Indiaच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, पगारात झाली वाढ

पेट्रोल आणि डिझेलमध्ये कोणताही बदल नाही

देशातील प्रमुख तेल कंपन्यांनी आज शनिवारी 16 एप्रिल रोजीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. हा सलग 11वा दिवस आहे जेव्हा पेट्रोल आणि डिझेलमध्ये कोणताही बदल झालेला नाही. 22 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत देशात पेट्रोलच्या दरात 10 रुपयांनी वाढ झाली होती. 6 एप्रिलपासून किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

Air travel will become more expensive big increase in jet fuel find out todays prices
70 हजारांच्या बजेटमध्ये बाइक, 3 सर्वोत्तम पर्याय मायलेजही उत्तम

विमान कंपन्यांवर भाडेवाढीचा दबाव

जेट इंधनाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे विमान कंपन्यांवर भाडेवाढीचा दबाव आला आहे. मात्र, भाडेवाढीचा कोरोनानंतर सुरू असलेल्या विमान कंपनीवर नकारात्मक परिणाम होणार आहे. हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, 12 राज्यांमध्ये इंधनावर 10-30 टक्के व्हॅट आकारला जातो. आम्ही या राज्यांच्या सतत संपर्कात आहोत. याशिवाय जेट इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करण्याचे आवाहनही वित्त मंत्रालयाला करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com