ICICI Bank: '13 कोटींहून अधिक रुपयांचा फ्रॉड', ICICI बँकेच्या बॅंक मॅनेजरवर महिलेचा मोठा आरोप; बॅंकेने सांगितले...

ICICI Bank: आयसीआयसीआयच्या (ICICI) बॅक मॅनेजरवर 16 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे.
ICICI Bank
ICICI BankDainik Gomantak
Published on
Updated on

ICICI Bank: आयसीआयसीआयच्या (ICICI) बॅक मॅनेजरवर 16 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, श्वेता शर्मा असे या महिलेचे नाव आहे. श्वेता यांनी सांगितले की, मी माझ्या अमेरिकन खात्यातून आयसीआयसीआय बँक खात्यात पैसे पाठवले होते. त्याचे एफडीमध्ये रुपांतर होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती.

श्वेता यांनी आरोप केला की, ''बँक अधिकाऱ्याने बनावट खाती उघडली आणि माझ्या खात्यातून पैसे काढण्यासाठी खोट्या सह्या केल्या. यानंतर माझ्या नावाने डेबिट कार्ड आणि चेकबुकही जारी करण्यात आले. त्या अधिकाऱ्याने मला बनावट स्टेटमेंटही दाखवले. एवढ्यावरच न थांबता त्याने माझ्या नावाने बनावट ईमेल आयडी बनवला आणि बँकेच्या रेकॉर्डमध्ये माझा मोबाईल नंबर बदलला. त्यामुळे पैसे काढल्याची माहिती माझ्यापर्यंत पोहोचू शकली नाही.''

वास्तविक, श्वेता शर्मा आणि त्यांचे पती अनेक दशके अमेरिका आणि हाँगकाँगमध्ये राहिले. 2016 मध्ये ते भारतात परतले. इथे त्यांच्या एका मित्राने सांगितले की, अमेरिकन बँकेत पैसे जमा केल्यावर मिळणारे व्याज खूपच कमी आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे पैसे भारतात जमा करावेत. आपल्या देशात एफडीवर 5.5 ते 6 टक्के दराने व्याज मिळू शकते. यानंतर ते गुरुग्राम येथील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेत गेले. येथे त्यांनी एनआरआय खाते उघडले. 2019 मध्ये, त्यांनी यूएस बँक खात्यातून आयसीआयसीआय बँक खात्यात पैसे पाठवण्यास सुरुवात केली. डिसेंबर 2023 पर्यंत त्यांनी सुमारे 13.5 कोटी रुपये जमा केले होते. त्यावर व्याज जोडल्यास रक्कम 16 कोटी रुपयांपर्यंत पोहोचते.

ICICI Bank
DICGC Rule For Banks: HDFC-SBI-ICICI शी संबंधित बदलला 'हा' नियम, ग्राहकांच्या फायद्यासाठी 1 सप्टेंबरपासून लागू होणार

फसवणूक कशी उघडकीस आली ते जाणून घ्या

श्वेता शर्मा यांनी सांगितले की, 'आम्हाला जानेवारी 2024 मध्ये या फसवणुकीची माहिती मिळाली. सर्व फिक्स डिपॉझिट गायब असल्याचे आम्हाला कळले. त्याचबरोबर ठेवींवर 2.5 कोटी रुपयांचा ओव्हरड्राफ्ट देखील घेण्यात आला होता. याबाबत मी बँकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. 16 जानेवारीला अधिकाऱ्यांसोबत पहिली बैठक झाली, यामध्ये बँकेच्या रीजनल आणि झोनल प्रमुखांव्यतिरिक्त इंटरनल इंटेलिजन्सचे प्रमुख होते. बॅंक मॅनेजरने फसवणूक केल्याचे त्यांनी मान्य केले. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, आयसीआयसीआय बँकेच्या प्रवक्त्याने फसवणुकीचा हा दावा खरा असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, 'आयसीआयसीआयमध्ये लाखो लोकांचे लाखो रुपये जमा आहेत. या प्रकरणात ज्यांचा सहभाग असेल त्यांना शिक्षा होईल.'

आयसीआयसीआय बॅंकेच्या वतीने सांगण्यात आले की

आयसीआयसीआय बॅंकेच्या वतीने सांगण्यात आले की, आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वोच्च प्राधान्य देतो. आम्ही त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. या प्रकरणात देखील, आम्ही ग्राहकाच्या आर्थिक हितसंबंधांचे रक्षण करणार आहोत. खरेतर, आम्ही ग्राहकाला कळवले आहे की, आम्ही 9.27 कोटी रुपयांची विवादित रक्कम (तिने आधीच 2 कोटी रुपयांची मुदत ठेव जमा केली आहे) त्यांच्या खात्यात धारणाधिकारासह हस्तांतरित करण्यास तयार आहोत, तपासाचा निकाल बाकी आहे.

सामान्यतः, आम्ही चालू असलेल्या तपासांवर भाष्य करणे टाळतो. तथापि, ग्राहकांकडून तुम्हाला मिळालेल्या तुमच्या प्रश्नांमध्ये उपस्थित केलेल्या सूचकांच्या प्रतिसादात आम्ही तुमचे लक्ष खालील मुद्द्यांकडे वेधून घेऊ इच्छितो:

ICICI Bank
DICGC Rule For Banks: HDFC-SBI-ICICI शी संबंधित बदलला 'हा' नियम, ग्राहकांच्या फायद्यासाठी 1 सप्टेंबरपासून लागू होणार

1) काही वर्षांपूर्वी खाते उघडल्यापासून बँकेने त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर व्यवहाराचे डिटेल्स सातत्याने पाठवले आहेत. मात्र हे आश्चर्यकारक आहे की, ग्राहक गेल्या तीन वर्षांतील त्यांच्या खात्यातील या व्यवहार आणि शिल्लक रकमेबद्दल अनभिज्ञ असल्याचा दावा करत आहे. मात्र, त्यांना अलीकडेच त्यांच्या खात्यातील शिलकीमध्ये तफावत आढळून आली आहे. प्राप्तिकर विवरणपत्र भरतानाही ही तफावत ग्राहकाने पाहिली पाहिजे.

2) त्यांच्या अकाऊंटचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी त्यांच्या नकळत बदलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तथापि, आमच्या रेकॉर्डवरुन असे सूचित होते की दोन्ही बदलांच्या सूचना त्यांच्या मूळ मोबाइल नंबर आणि ईमेल पत्त्यावर पाठवल्या गेल्या ज्या बँकेकडे नोंदणीकृत आहेत. शिवाय, नवीन क्रमांक ग्राहकाच्या स्वतःच्या मालकीच्या कंपनीच्या वेबसाइटवर सूचीबद्ध आहे.

तत्पूर्वी, आम्ही दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखे (EoW) कडे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी तक्रार दाखल केली आहे. पोलीस तपासात आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com