First Republic Bank: सिलिकॉन व्हॅली आणि सिग्नेचर नंतर आता अमेरिकेची आणखी एक बँक अडचणीत...

शेअरमध्ये 70 टक्क्यांची घसरण, पुरेशी रोकड असल्याचा बँकेचा दावा
First Republic Bank
First Republic BankDainik Gomantak

First Republic Bank: अमेरिकेतील बँकिंग क्षेत्रातील संकट थांबण्याचे नाव घेत नाही आहे. सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँकांच्या दिवाळखोरीनंतर आता अमेरिकेतील आणखी एक बँक अडचणीत आली आहे. फर्स्ट रिपब्लिक बँक असे या बँकेचे नाव असून गेल्या 5 दिवसात फर्स्ट रिपब्लिक बँकेच्या शेअरमध्ये 65.61 टक्क्यांची घसरण झाली आहे.

First Republic Bank
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींना मिळू शकतो शांततेचा नोबेल? नॉर्वेहून पुरस्कार समितीचे पथक भारतात...

दुसरीकडे, एका महिन्यात शेअरच्या किमतीत 70.30% ने घट झाली आहे. अशा स्थितीत गुंतवणूकदारांमध्ये या बँकेची चिंता वाढली आहे.

मूडीज या रेटिंग एजन्सीने पुनरावलोकनाखाली ठेवलेल्या सहा अमेरिकन बँकांमध्ये फर्स्ट रिपब्लिक बँकेचे नाव देखील आहे. याशिवाय, रेटिंग एजन्सीने Zions Bancorp, Western Aliens Bancorp, Comerica Inc, UMB Financial Corp आणि Intrust Financial Corporation यांचे रेटिंग देखील कमी केले आहे आणि त्यांना पुनरावलोकनाखाली ठेवले आहे.

याआधी सोमवारी, मूडीजने सिग्नेचर बँकेचे कर्ज रेटिंग जंक टेरिटरीमध्ये खाली आणले. दरम्यान, फर्स्ट रिपब्लिक बँकेने म्हटले आहे की, बँक चालवण्यासाठी पुरेशी रोकड आमच्याकडे आहे. त्याने अतिरिक्त तरलतेसाठी फेड आणि जेपी मॉर्गनशी हातमिळवणी केली आहे.

First Republic Bank
Costliest Penthouse Deal: भारतातील सर्वात महागडे पेंट हाऊस, या व्यक्तीने मुंबईत 252.5 कोटींना केले खरेदी

सोमवारी, वेस्टर्न अलायन्सने म्हटले होते की, बँकेकडे 25 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रोकड उपलब्ध आहे. दरम्यान, याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना प्रश्न विचारला असता त्यांनी काहीही उत्तर दिले नाही. उलट ते कार्यक्रमातून उठून गेले.

भारतीय बँका मजबूत स्थितीत

अमेरिकन गुंतवणूक कंपनी जेफरीज आणि वित्तीय सेवा फर्म मॅक्वेरी यांनी दोन मोठ्या अमेरिकन बँकांच्या दिवाळखोरीमुळे भारतीय बँकांवर परिणाम होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे.

स्थानिक ठेवींवर अवलंबून राहणे, सरकारी रोख्यांमधील गुंतवणूक आणि पुरेशी रोकड यामुळे भारतीय बँका मजबूत स्थितीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

काही महिन्यांपासून भारतीय बँकांची कामगिरी विदेशी बँकांपेक्षा चांगली आहे. जेफरीजच्या मते, बहुतेक भारतीय बँकांनी सिक्युरिटीजमध्ये केवळ 22-28% गुंतवणूक केली आहे. बँकांच्या सिक्युरिटीज गुंतवणुकीपैकी 80% सरकारी रोखे आहेत.

बहुतांश बँका यापैकी 72-78% मुदतपूर्तीपर्यंत ठेवतात. याचा अर्थ त्यांच्या किमती घसरल्याने या गुंतवणुकीवर परिणाम होणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com