lights
lights Dainik Gomantak

Adani Power: अदानींच्या 'या' निर्णयाने वाढवली हरियाणाची चिंता, उन्हाळ्यात जनता...!

Haryana: वीज केंद्रांमधील कोळशाचे संकट पाहता कंपनीने हरियाणाचा वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे.
Published on

Adani Power: अडचणीत सापडलेल्या अदानी समूहाने हरियाणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. वीज केंद्रांमधील कोळशाचे संकट पाहता कंपनीने हरियाणाचा वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अदानी पॉवर हरियाणा सरकारसोबत झालेल्या वीज खरेदी करारात सुधारणा करत आहे.

यंदा अधिक उकाडा अपेक्षित असल्याने विजेची मागणी यंदा अधिक राहणार आहे. या कठीण काळात अदानीच्या या निर्णयाचा परिणाम हरियाणातील उद्योग आणि शहरी ग्राहकांवर होऊ शकतो.

दरम्यान, अदानी समूहाच्या अदानी पॉवर या कंपनीने हरियाणातील (Haryana) दोन वीज वितरण कंपन्यांचा (डिस्कॉम) वीजपुरवठा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दक्षिण हरियाणा बिजली वितरण निगम लिमिटेड आणि उत्तर हरियाणा बिजली वितरण निगम लिमिटेड यांच्याशी वीज खरेदी करारात सुधारणा करुन ते प्रति डिस्कॉम 712 MW वरुन 600 MW पर्यंत कमी केले जात असल्याचे कंपनीने BSE ला दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.

lights
Gautam Adani : गौतम अदानी टॉप-30 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर; अदानींकडे शिल्लक राहिली 'एवढीच' संपत्ती

तसेच, अदानी पॉवरने (Adani Power) त्यांच्या मुंद्रा प्लांटमधून निर्माण होणारी प्रत्येकी 720 मेगावॅट वीज हरियाणातील दोन डिस्कॉम्सना विकण्यासाठी वीज खरेदी करार केला होता. परंतु आता पुरवठा करण्यात येणारी वीज प्रत्येकी 600 मेगावॅट करण्यात आली आहे.

lights
Gautam Adani: अदानींनी 3 कंपन्यांचे शेअर्स ठेवले गहाण, ग्रुप गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा मिळवणार का?

कंपनीने सांगितले की, देशांतर्गत कोळशाची उपलब्धता लक्षात घेऊन कराराच्या अटींमध्ये बदल करणे आवश्यक होते. त्यात म्हटले आहे की, दोन्ही डिस्कॉम घरगुती कोळशापासून निर्माण होणाऱ्या विजेसाठी निश्चित दर देतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com