Adani Ports: अदानी पोर्ट्सचा नफा घटला तरी महसुल आणि शेअरच्या किमतीत वाढ

वार्षिक आधारावर अदानी पोर्ट्समध्ये 17 टक्क्यांची वाढी झाली असून, उत्पन्न 4,786 कोटी रुपये झाले आहे.
Gautam Adani | Adani Group
Gautam Adani | Adani Group Dainik Gomantak
Published on
Updated on

अदानी पोर्ट्सने मंगळवारी ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. 2022 च्या ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा (Adani Ports Net Profit) 16 टक्क्यांनी कमी होऊन 1,315 कोटी रुपये होता. 2021 च्या ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत कंपनीला 1,567 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. अशी माहिती कंपनीने दिली आहे.

अदानी पोर्ट्सच्या महसुलात वाढ

वार्षिक आधारावर अदानी पोर्ट्समध्ये 17 टक्क्यांची वाढी झाली असून, उत्पन्न 4,786 कोटी रुपये झाले आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या तिसऱ्या तिमाहीत हा आकडा 4072 कोटी रुपये होता. कंपनीने ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीसाठी 3,011 कोटी रुपयांचा EBITDA नोंदवला आहे. 2021 च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीतील 2,612 कोटी रुपयांच्या EBITDA पेक्षा हा 15 टक्के अधिक आहे.

शेअरच्या किमतीत वाढ

अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये सलग 9 दिवसांच्या घसरणीनंतर आज मोठी रिकव्हरी होताना दिसत आहे. आजच्या व्यवहारात अदानी समूहाचे शेअर्स 20 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत, ज्यामुळे ते 01 वर्षाच्या नीचांकी पातळीवर आले आहेत. पहिल्या 9 दिवसांत सतत विक्री सुरू असताना, समूह कंपन्यांमधील गुंतवणूकदारांची संपत्ती 50 टक्क्यांपर्यंत घसरली होती.

Gautam Adani | Adani Group
Free Air Travel: ज्येष्ठ नागरिकांसाठी खूशखबर, विमानाने करता येणार मोफत प्रवास; सरकारने केली मोठी घोषणा

माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी पोर्ट्सचा शेअर 5.21 टक्क्यांनी वाढून 573.85 रुपयांवर पोहोचला. मागील सत्रात शेअर 545.45 रुपयांवर बंद झाला होता. गेल्या पाच दिवसांत हा शेअर 9.67 टक्क्यांच्या आसपास घसरला आहे.

गेल्या महिन्यात अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात अदानी समूहावर अनेक प्रकारच्या आर्थिक अनियमिततेचा आरोप करण्यात आला होता. यानंतर अदानी समूहाच्या बहुतांश शेअर्स मध्ये जबरदस्त विक्री दिसून आली. त्यामुळे सर्वांच्या नजरा अदानी समूहाच्या कंपन्यांच्या तिमाही निकालाकडे लागल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com