नेपाळच्या ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या भूमिका श्रेष्ठांनी स्विकारला इंटरनॅशनल वुमन ऑफ करेज पुरस्कार

अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने नेपाळी नागरिकाला इंटरनॅशनल वुमन ऑफ करेज पुरस्कार देण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे.
Bhumika Shrestha
Bhumika Shrestha@USEmbassyNepal
Published on
Updated on

काठमांडू: नेपाळच्या ट्रान्सजेंडर (Transgender) कार्यकर्त्या भूमिका श्रेष्ठ (Bhumika Shrestha) हिला प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय शूरता पुरस्कार 2022 (International Women of Courage) देण्याची घोषणा करण्यात आली आहे. एलजीबीटीआय समुदायाचे जीवन सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांना हा सन्मान देण्यात येत आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने नेपाळी (Nepal) नागरिकाला हा पुरस्कार देण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. गेल्या वर्षी मुस्कान खातून यांना अ‍ॅसिड हल्ल्यांविरोधात केलेल्या कामासाठी हा पुरस्कार देण्यात आला होता. येथील यूएस दूतावासाने दिलेल्या निवेदनानुसार, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन ऑनलाइन समारंभात वार्षिक IWOC पुरस्कारांच्या सादरीकरणाशी संबंधित कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा पुरस्कार जगभरातील महिलांना गेल्या पंधरा वर्षांपासून दिला जातो आहे.

अमेरिकन फर्स्ट लेडी डॉक्टर जिल बायडन यांनी 14 मार्च रोजी झालेल्या कार्यक्रमादरम्यान भूमिका श्रेष्ठचे कौतूक केले. ट्रान्सजेंडर कार्यकर्ती श्रेष्ठ यांनी लैंगिक अल्पसंख्याक हक्क आणि सामाजिक न्यायासाठी लढा देते आहे. 2022 IWOC पुरस्कार समारंभात जगभरातील 12 असामान्य महिलांना सन्मानित केले. या महिलांनी सर्वांसाठी उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी कार्य केले आणि करत आहेत. भूमिकाचे नाव अराजकीय जगाच्या100 सर्वात प्रभावशाली लोकांमध्ये घेतले जाते. नेपाळच्या ब्लू डायमंड सोसायटीमधील ट्रान्सजेंडर कार्यकर्ती भूमिका एक मॉडेल आणि अभिनेत्री देखील आहे. भूमिका श्रेष्ठ हिला लिंग समानता टॉप 100 “द मोस्ट इन्फ्लुएंशियल पीपल इन ग्लोबल पॉलिसी” 2019 मध्ये समावेश करण्यात आला होता.

Bhumika Shrestha
Ukraine-Russia Crisis: मध्यपूर्वेतील देश का घाबरतायेत रशियाला, जाणून घ्या

ट्रान्सजेंडर चळवळीचा आवाज बनली भूमिका

नेपाळमधील ट्रान्सजेंडर चळवळीचा भूमिका आवाज बनली आहे. एक ट्रान्सजेंडर महिला म्हणून तिच्या स्वतःच्या अनुभवांमुळे, ती LGBT समुदायाविरुद्ध भेदभाव रोखणारे कायदे बदलण्याबाबत बोलते आहे. नेपाळी पासपोर्टवर तृतीय लिंगाचा पर्याय समाविष्ट करण्यासाठी ब्लू डायमंड सोसायटी या नेपाळी LGBT अधिकार संस्थेसोबत प्रचारात तिने मोठी भूमिका बजावली. तृतीय पंथी चिन्हांकित कायदेशीर मान्यताप्राप्त कागदपत्रांसह देशात प्रवास करणारी ती पहिली नेपाळी नागरिक होती. भूमिकाच्या आयुष्यातील बदलामागे मोठी कहानी आहे.

मुस्कान खातून हिला IWOC अवॉर्ड मिळाला आहे

गेल्या वर्षी हा पुरस्कार मिळालेली मुस्कान खातून अॅसिड पीडित आहे. या जघन्य गुन्ह्याविरोधात ती कठोर कायद्यासाठी आवाज उठवत आहे. “जेव्हा माझ्यावर उपचार सुरू होते, तेव्हा मी पुन्हा पुन्हा विचार करत होते की उपचारासाठी पैसे कुठून येणार. माझे कुटुंब काय करेल? या वेदनेच्या गडबडीत मी माझ्यासारख्या सर्व मुलींचा विचार केला ज्या या वेदना सहन करत आहेत, असे मुस्कान यांचे म्हणणे आहे. मुस्कानच्या मेहनतीला नेपाळमध्ये काही प्रमाणात फळ मिळाले असून नेपाळमध्ये या गुन्ह्यासाठी अध्यादेश जारी करून नवीन कायदा करण्यात आला आहे. अॅसिड हल्ल्यांविरुद्धच्या लढ्यात तिच्या योगदानासाठी आणि धैर्यासाठी मुस्कानला अमेरिकेतील इंटरनॅशनल वुमन ऑफ करेज (IWOC) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com