Truck Drivers चा प्रवास होणार गारेगार! 2025 पासून अवजड वाहनांच्या केबिनमध्ये एसी बंधनकारक

AC Cabin In Trucks: गडकरी म्हणाले होते की, चालकांच्या कमतरतेमुळे भारतात चालक १४ ते १६ तास सतत काम करत असतात, तर इतर देशांमध्ये त्यांचे कामाचे तास निश्चित असतात.
AC Cabin In Trucks In India
AC Cabin In Trucks In IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

AC mandatory in cabin of heavy vehicles from 2025 in India:

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ट्रक उत्पादक कंपन्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. आता परदेशाप्रमाणे भारतातही ट्रकच्या केबिनमध्ये एसी अनिवार्य करण्यात आला आहे.

मंत्रालयाच्या राजपत्रानुसार, 1 ऑक्टोबर 2025 रोजी किंवा त्यानंतर उत्पादित केलेल्या सर्व नवीन ट्रकमध्ये चालकांसाठी एसी केबिन असणे आवश्यक आहे.

यापूर्वीही वाहनचालकांसाठी एसी केबिनची मागणी सतत होत होती. बदलते हवामान, प्रचंड उष्णता आणि थंडी यामुळे भारतीय वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागायचा. आता शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यांना प्रतिकूल हवामानात व्यवस्थित गाडी चालवणे सोपे जाईल.

मंत्रालयाने म्हटले आहे की, N2 आणि N3 श्रेणीतील वाहनांच्या केबिनसाठी वातानुकूलित यंत्रणा 1 ऑक्टोबर 2025 रोजी किंवा त्यानंतर उत्पादित वाहनांमध्ये बंधनकारक केले जाईल. यासाठी वातानुकूलित यंत्रणेची चाचणीही केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

जुलैमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले होते की ट्रकच्या केबिनमध्ये वातानुकूलन यंत्रणा बसवणे अनिवार्य करण्याच्या मसुद्याच्या अधिसूचनेला मान्यता देण्यात आली आहे.

AC Cabin In Trucks In India
Coca Cola India चे मद्य क्षेत्रात पाऊल; गोवा आणि महाराष्ट्रात सुरू केली Lemon-Dou ची विक्री

वाहतूक क्षेत्रात ट्रक चालकांची भूमिका महत्त्वाची आहे, असेही नितीन गडकरी म्हणाले होते. भारतासाठी हे सर्वात महत्त्वाचे क्षेत्र आहे. त्यांच्या कामाच्या परिस्थिती आणि मानसिक स्थितीशी संबंधित समस्यांवर लक्ष देणे आवश्यक आहे.

ट्रक चालकांना प्रचंड उष्णतेच्या परिस्थितीत काम करावे लागत असल्याची व्यथा मांडत केंद्रीय मंत्री म्हणाले की, आपण ट्रक चालकांसाठी वातानुकूलित केबिनसाठी बराच काळ दबाव टाकत आहोत, तर काहींनी यावर आक्षेप घेत, यामुळे भांडवलात वाढ करावी लागेल असे त्यांचे मत होते.

AC Cabin In Trucks In India
नंबर 'वन'साठी मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यात पुन्हा एकदा रेस, अदानींच्या संपत्तीत झपाट्याने वाढ

काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चालकांच्या कामाच्या परिस्थितीत सुधारणा करण्याच्या गरजेवर भर दिला आणि अधिक ड्रायव्हिंग स्कूल स्थापन करून चालकांची कमतरता दूर करण्यासाठी पावले उचलण्याची गरज असल्याचे सांगितले होते.

गडकरी म्हणाले होते की, चालकांच्या कमतरतेमुळे भारतात चालक १४ ते १६ तास सतत काम करत असतात, तर इतर देशांमध्ये त्यांचे कामाचे तास निश्चित असतात.

ते म्हणाले की, भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आली आहे आणि त्यासाठी लॉजिस्टिक खूप महत्त्वाची आहे.

गडकरी म्हणाले की, जगाच्या तुलनेत आमचा भांडवल खर्च १४-१६ टक्के आहे. चीनमध्ये ते 8-10 टक्के आहे, युरोपियन देशांमध्ये ते 12 टक्के आहे. निर्यात वाढवायची असेल तर भांडवल खर्चात कपात करावी लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com