जर UPI वर ट्रान्झॅक्शन चार्जेस आकारले गेले तर बहुतेक यूजर्स, यूपीआय एप्स वापरणे बंद करतील, असा खुलासा नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून समोर आला आहे. लोकलसर्कलच्या ऑनलाइन सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे.
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात दावा केला आहे की, त्यांना गेल्या एका वर्षात त्यांच्या UPI पेमेंटवर एक किंवा अधिक वेळा ट्रान्झॅक्शन चार्जेस आकारले गेले आहेत.
लोकलसर्कलने नुकतेच सांगितले की, सर्वेक्षणात 364 हून अधिक जिल्ह्यांतील 34,000 हून अधिक लोकांनी आपले मत नोंदवले. त्यापैकी ६७ टक्के पुरुष आणि ३३ टक्के महिला होत्या.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑगस्ट 2022 मध्ये एक पेपर जारी केला, ज्यामध्ये UPI पेमेंटवर वेगवेगळ्या रकमेवर आधारित कंपोझिशन चार्ज लावण्याचा प्रस्ताव होता. तथापि, अर्थ मंत्रालयाने नंतर स्पष्ट केले की UPI व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.
ताज्या सर्वेक्षणानुसार केवळ 23 टक्के UPI यूजर्स पेमेंटवर व्यवहार शुल्क भरण्यास तयार आहेत. सर्वेक्षण केलेल्यांपैकी 73 टक्के लोकांनी सांगितले केले की, व्यवहार शुल्क लागू झाल्यास ते UPI वापरणे बंद करतील.
सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की सुमारे 50 टक्के UPI यूजर्स दर महिन्याला 10 पेक्षा जास्त व्यवहार करतात. सध्या देशभरात UPI द्वारे केलेल्या कोणत्याही व्यवहारावर कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ने 2024 ला जोरदार सुरुवात केली आहेय आतापर्यंत विक्रमी 18 लाख कोटींहून अधिक व्यवहार यूपीआयद्वारे झाले आहेत.
जानेवारीमध्ये UPI नेटवर्कवरील व्यवहारांची संख्या 1,202 कोटींवर स्थिर राहिली. या वर्षी व्यवहाराचे प्रमाण 52 टक्क्यांनी जास्त होते.
2023 मध्ये 182.25 लाख कोटी रुपयांचे 11,765 UPI व्यवहार झाले आहेत. 2022 च्या तुलनेत व्हॉल्यूममध्ये 59 टक्के आणि मूल्यात 45 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.