

8th Pay Commission Fitment Factor Hike Expectations: देशभरात आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची चर्चा जोरात सुरु असून, लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना केवळ सॅलरी इंक्रीमेंटचाच लाभ मिळणार नाही, तर इतर अनेक सुविधांचाही फायदा होईल. मात्र, सध्या केंद्रीय कर्मचारी उच्च वेतन वाढीऐवजी उच्च 'फिटमेंट फॅक्टर' आणि वाढीव वार्षिक वेतनवाढ दराची जोरदार मागणी करत आहेत, कारण या दोन्ही घटकांचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीवर होणार आहे.
फिटमेंट फॅक्टर जितका जास्त असेल, तितकी मूळ वेतनातील वाढ मोठी असेल, तर उच्च इंक्रीमेंट रेटमुळे दरवर्षी वेतन वाढून दीर्घकाळ लाभ मिळत राहील. सातव्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर 2.57 टक्के इतका होता, परंतु आठव्या वेतन आयोगासाठी विविध कर्मचारी संघटनांनी यात वाढ करुन तो 3.833 टक्के किंवा त्याहून अधिक करण्याची मागणी केली, ज्यामुळे सध्याची किमान मूळ वेतन श्रेणी लक्षणीयरीत्या उंचावण्याची अपेक्षा आहे.
कर्मचारी संघटनांच्या मते, जर मागितल्याप्रमाणे फिटमेंट फॅक्टर लागू झाला तर सातव्या वेतन आयोगातील 18,000 रुपये मूळ वेतन थेट वाढून जवळपास 69,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते. याशिवाय, सातव्या वेतन आयोगात 3 टक्के असलेला एन्युअल इंक्रीमेंट रेट वाढवून 6 ते 7 टक्के करण्याची मागणी काही प्रमुख संघटनांनी केली. जर सरकार आणि आयोगाने हा इंक्रीमेंट रेट मान्य केला, तर दरवर्षी वेतन वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांचे एकूण वेतन अवघ्या 7 ते 8 वर्षांतच दुप्पट होऊ शकते आणि त्यांना पुढील वेतन आयोगाची प्रतीक्षा करावी लागणार नाही.
उदाहरणार्थ, योग्य फिटमेंट फॅक्टर आणि 7 टक्के इंक्रीमेंट रेट लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीत पहिल्या वर्षापासून ते दहाव्या वर्षापर्यंत प्रचंड वाढ दिसून येईल, ज्यामुळे लेवल 5, 6 आणि 7 मधील कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळून त्यांचे राहणीमान अधिक उंचावण्यास मदत होईल, अशी चिन्हे आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.