7th Pay Commission: 2023 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांची चांदी, पगार होणार दुप्पट! सरकारने दिली अपडेट

7th Pay Commission latest News: 2023 च्या सुरुवातीलाच सरकार अनेक मोठ्या निर्णयांना संमती देऊ शकते. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कर्मचाऱ्यांना वाढीव डीएचा लाभ मिळणार आहे.
Money
MoneyDaINIK Gomantak
Published on
Updated on

7th Pay Commission Latest News: केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात अनेक चांगल्या बातम्या मिळणार आहेत. 2023 च्या सुरुवातीलाच सरकार अनेक मोठ्या निर्णयांना संमती देऊ शकते. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कर्मचाऱ्यांना वाढीव डीएचा लाभ मिळणार आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांशी संबंधित 3 मोठ्या मुद्द्यांवर सरकार निर्णय घेऊ शकते. या सर्व निर्णयांचा संबंध पगाराशी आहे.

दरम्यान, सरकार 2023 मध्ये दीर्घकाळ चालणाऱ्या फिटमेंट फॅक्टरवर निर्णय घेऊ शकते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकार कर्मचाऱ्यांना फिटमेंट फॅक्टरची भेट देऊ शकते. याशिवाय महागाई (Inflation) भत्ता आणि जुनी पेन्शन योजना यावरही निर्णय घेतला जाऊ शकतो.

Money
7th Pay Commission: नवीन वर्षापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, महागाई भत्त्यात होणार मोठी वाढ!

फिटमेंट फॅक्टरवर निर्णय घेतला जाईल

नवीन वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Employees) सरकार आतापर्यंतची सर्वात मोठी भेट देऊ शकते. पहिला महागाई भत्ता, एचआरए, टीए, पदोन्नतीनंतर फिटमेंट फॅक्टरवरही पुढील वर्षी चर्चा होऊ शकते. सूत्रांवर विश्वास ठेवल्यास, सरकार कर्मचाऱ्यांच्या पगारात 8000 रुपयांनी वाढ करण्याचा थेट विचार करु शकते.

वास्तविक, फिटमेंट फॅक्टर वाढल्याने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मजबूत वाढ होईल. सध्या कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगांतर्गत किमान वेतन म्हणून 18000 रुपये मिळतात. पुढील वर्षी 1 फेब्रुवारी 2023 रोजी सादर होणार्‍या अर्थसंकल्पानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर सरकार निर्णय घेऊ शकते.

Money
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज, DA नंतर आणखी एका भत्त्यात वाढ!

महागाई भत्ता पुन्हा वाढेल

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचा दर 6 महिन्यांनी आढावा घेतला जातो. AICPI डेटाच्या आधारे, महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवला जातो. ही वाढ जानेवारी आणि जुलैमध्ये होते. दरवर्षीप्रमाणे 2023 मध्येही केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. जानेवारी 2023 चा महागाई भत्ता मार्चपूर्वी जाहीर केला जाईल. आतापर्यंतचे महागाईचे आकडे पाहता पुढील वर्षी 4 टक्के महागाई दरवाढ होऊ शकते असे दिसते. तथापि, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरचे AICPI निर्देशांक अजून येणे बाकी आहे.

Money
7th Pay Commission: ही बातमी केंद्रीय कर्मचाऱ्यांना करणार खूश, पगारात थेट 49420 रुपयांची वाढ!

जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार!

पुढील वर्षी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनची मोठी भेट देऊ शकते. सन 2023 मध्ये जुनी पेन्शन योजना लागू केली जाऊ शकते. खरे तर जुनी पेन्शन लागू करावी, अशी कर्मचाऱ्यांची अनेक दिवसांपासून मागणी होती. काही राज्यांनी निवडणूक आश्वासने पाळत जुनी पेन्शनही लागू केली आहे. पंजाब मंत्रिमंडळानेही त्यास मान्यता दिली आहे. वास्तविक, यासाठी केंद्र सरकारने विधी मंत्रालयाकडून जुन्या पेन्शन योजनेबाबत मत मागवले होते. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, 7 व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत, मोदी सरकार 2024 पूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू करु शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com