7th Pay Commission: ही बातमी केंद्रीय कर्मचाऱ्यांना करणार खूश, पगारात थेट 49420 रुपयांची वाढ!

Dearness Allowance: लाखो कर्मचाऱ्यांच्या वर्षभराच्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. फिटमेंट फॅक्टरच्या फाइलवर काम सुरु असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Money
MoneyDaINIK Gomantak
Published on
Updated on

Fitment Factor Update: नवीन वर्ष सुरु व्हायला जवळपास महिना उरला आहे. 2023 या वर्षाची सुरुवात होत असतानाच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी बातमी मिळत आहे. लाखो कर्मचाऱ्यांच्या वर्षभराच्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. फिटमेंट फॅक्टरच्या फाइलवर काम सुरु असल्याचा दावा करण्यात येत आहे. परंतु 2023 च्या अखेरीस यावर निर्णय अपेक्षित आहे. पगारवाढ मूळ स्तरावर असेल.

फिटमेंट फॅक्टर किती वाढणे अपेक्षित आहे?

सप्टेंबरमध्ये 4 टक्क्यांच्या वाढीसह केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्क्यांवर पोहोचला आहे. जानेवारी आणि जुलैमध्ये त्यात आणखी वाढ केली जाईल. पण सातव्या वेतन आयोगांतर्गत फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी केंद्रीय कर्मचारी (Employees) बऱ्याच दिवसांपासून करत आहेत.

Money
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात होणार बंपर वाढ, सरकारकडून कन्फर्म !

दुसरीकडे, 2023 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी (Election) हा मुद्दा अंतिम करण्याचा सरकार विचार करत असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. सध्या केंद्रीय कर्मचार्‍यांचे किमान वेतन 18,000 रुपये आहे, ज्याचे फिटमेंट फॅक्टर 2.57 पट आहे. ती वाढवून 3.68 पटींनी करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती.

पगार किती वाढणार?

फिटमेंट फॅक्टर 3 पट असला तरी पगारात लक्षणीय वाढ होईल. उदाहरणार्थ, ज्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18,000 रुपये आहे, सध्या त्याचा पगार 18,000 X 2.57 = 46,260 रुपये आहे. पण जेव्हा फिटमेंट फॅक्टर तिप्पट होईल तेव्हा मूळ वेतन 21,000 रुपये होईल. त्याचवेळी, भत्त्यांव्यतिरिक्त एकूण वेतन 21000X3 म्हणजेच 63,000 रुपये असेल.

Money
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचार्‍यांचे बल्ले-बल्ले, नवीन वर्षात मिळणार ट्र‍िपल बोनस

तसेच, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात भत्त्यांव्यतिरिक्त इतर भत्ते आहेत. पगारामध्ये भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटीचाही समावेश होतो. केंद्रीय कर्मचार्‍यांचे ईपीएफ आणि ग्रॅच्युइटी मूळ वेतन आणि डीएशी जोडलेले आहेत. यामुळेच त्यांचा ईपीएफ आणि ग्रॅच्युइटी मोजण्यासाठी वेगळा फॉर्म्युला लागू केला जातो. CTC कडून भत्ते आणि इतर कपात केली जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com