भारतातील 'या' 13 प्रमुख शहरांमध्येच मिळणार 5G नेटवर्क

केंद्रीय मंत्रिमंडळाने 5G लिलावासाठी स्पेक्ट्रम किंमतीला हिरवा कंदील दाखवला आहे
5G Network in India
5G Network in IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

भारत सरकारने 5G स्पेक्ट्रम लिलावांना मान्यता दिली आहे, याचा अर्थ असा आहे की 5G सेवा लवकरच येत्या काही महिन्यांत सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 5G लिलावासाठी स्पेक्ट्रम किंमतीला हिरवा कंदील दिला आहे. कॅबिनेट दावा करत आहे की 5G वापरकर्त्यांना भारतातील 4G नेटवर्कपेक्षा 10 पट वेगवान गती मिळेल. (5G Network in India)

आता सरकारने 5G स्पेक्ट्रम लिलावांना मंजुरी दिली आहे, दूरसंचार विभाग (DoT) सूचना आमंत्रित अर्ज (NIA) वर काम करण्यास सुरुवात करेल. हे प्रसिद्ध झाल्यानंतर, काही आठवड्यांत लिलाव सुरू होईल. 5G सेवांचा रोलआउट केव्हा होईल हे सध्या सांगितले नसले तरी, वापरकर्ते 2022 मध्ये त्यांचा अनुभव घेऊ शकतील.

5G Network in India
5G नेटर्वकचा मिळणार लाभ, सरकारने दिली 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला मंजुरी

5G इंडिया लाँच 15 ऑगस्ट रोजी सुरू होईल असे सांगितले होते,परंतु अद्याप तरी असे होणे शक्य नाही. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन 5G चे व्यावसायिक रोलआउट सप्टेंबरमध्ये होऊ शकते. लक्षात घ्या की सुरुवातीच्या टप्प्यात 5G प्रत्येकासाठी उपलब्ध होणार नाही आणि हळूहळू ते संपूर्ण भारतात उपलब्ध केले जाईल.

काही महिन्यांत 5G देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल अशी अपेक्षा करण्यास काही हरकत नाही. 5G नेटवर्कला कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात. अजूनही काही ठिकाणी 4G नेटवर्क उपलब्ध नाही. हल्लीचे उदाहरण द्यायचे झाले तर काही दिवसांपूर्वीच लडाखमध्ये 4G नेटवर्क पहिल्यांदाच सुरू करण्यात आले होते.

दूरसंचार विभाग (DoT) नुसार, 5G प्रथम भारतातील फक्त 13 मोठ्या शहरांमध्ये आणले जाईल. यामध्ये अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, जामनगर, हैदराबाद, पुणे, लखनौ, मुंबई आणि कोलकाता यांचा समावेश आहे. सध्या, कोणता दूरसंचार ऑपरेटर प्रथम 5G सेवा सुरू करेल यावर कोणताही शिकामोर्तब झाला नाही.

5G Network in India
RBI ने हटवली Mastercard वरील बंदी, कंपनी करु शकणार हे काम

सरकारने पुष्टी केली आहे की एकूण 72GHz स्पेक्ट्रम 600 MHz, 700 MHz, 800 MHz, 900 MHz, 1800 MHz, 2100 MHz, 2300 MHz, 3300 MHz, आणि 3300 MHz, अशा अनेक फ्रिक्वेन्सी बँडमध्ये लिलाव केला जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com