RBI ने हटवली Mastercard वरील बंदी, कंपनी करु शकणार हे काम

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मास्टरकार्डला मोठा दिलासा दिला आहे.
RBI
RBIDainik Gomantak
Published on
Updated on

RBI Lift Restrictions on Mastercard: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मास्टरकार्डला मोठा दिलासा दिला आहे. मध्यवर्ती बँकेने गेल्या काही दिवसांत मास्टरकार्डवर घातलेले निर्बंध हटवले आहेत. आरबीआयच्या या निर्णयानंतर कंपनी नवीन ग्राहकांना ऑनबोर्ड करु शकणार आहे. जुलै 2021 पासून मास्टरकार्डवर नवीन कार्ड जारी करण्यावर बंदी घालण्यात आली होती.

कंपनीने भारतीय नियमांचे उल्लंघन केले आहे

रिझर्व्ह बँकेच्या (RBI) डेटा स्टोरेजच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यामुळे मास्टरकार्डवर 22 जुलै 2021 पासून नवीन कार्ड जारी करण्यावर बंदी घालण्यात आली होती. परंतु, कंपनीच्या जुन्या ग्राहकांवर याचा कोणताही परिणाम झाला नाही. वास्तविक, स्टोरेज नियमांनुसार, भारतातील ग्राहकांच्या पेमेंटशी संबंधित डेटा संग्रहित करणे आवश्यक होते. मात्र कंपनीने हे केले नाही.

डाटा लोकलाइजेशन नियम 2018 मध्ये जारी केला गेला

RBI ने एप्रिल 2018 मध्ये डेटा लोकलाइजेशन नियम जारी केले होते. या अंतर्गत, सर्व सेवा प्रदात्यांना 6 महिन्यांच्या आत सर्व पेमेंट संबंधित डेटा देशात ठेवण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

हळूहळू कंपन्यांनी नियम मान्य केले

सुरुवातीला, मायक्रोसॉफ्ट (Microsoft), गुगल, अ‍ॅमेझॉनसह (Amazon) अनेक जागतिक बँकांनी डेटा लोकलाइजेशन नियमांना विरोध केला. परंतु नंतर हळूहळू कंपन्यांनी हे नियम मान्य केले. तर, पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर मास्टरकार्ड पुरेसा वेळ आणि संधी देऊनही नियमांची पूर्तता करण्यात अपयशी ठरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com