Xeldem Hill Cutting Dainik Gomantak
Video

Xeldem News: शेल्डेतील बेकायदेशीर डोंगर कापणीची फ्लाइंग स्क्वॉडने केली पाहणी

Xeldem Hill Cutting: राज्य सरकारने डोंगर कापणीविरोधात कडक भूमिका घेतली असताना बऱ्याच ठिकाणी डोंगर कापणी करून प्लॉट तयार केले जात आहेत. अशीच डोंगरकापणी शेल्डे पंचायत क्षेत्रात झाली असून याविरोधात या भागातील ग्रामस्थांनी शेल्डे पंचायतीच्या ग्रामसभेत आवाज उठवला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Xeldem Hill Cutting News

केपे: राज्य सरकारने डोंगर कापणीविरोधात कडक भूमिका घेतली असताना बऱ्याच ठिकाणी डोंगर कापणी करून प्लॉट तयार केले जात आहेत. अशीच डोंगरकापणी शेल्डे पंचायत क्षेत्रात झाली असून याविरोधात या भागातील ग्रामस्थांनी शेल्डे पंचायतीच्या ग्रामसभेत आवाज उठवला होता. त्यानंतर आज भरारी पथकाने या भागाची पाहणी केली.

काही महिन्यांपूर्वी सोनफातर-शेल्डे येथील हाऊसिंग बोर्डला लागून असलेल्या डोंगराची मोठ्या प्रमाणात कापणी केली होती. या डोंगर कापणीविषयी रविवार, ३ रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी याविषयी पंचायत मंडळाला प्रश्न विचारून त्या जागेवर कोणतेच बांधकाम करण्यास आमचा विरोध असल्याचे सांगितले होते. या जागेची पाहणी करण्याची मागणी केली होती.

आज सकाळी दक्षिण गोव्याच्या भरारी पथकाने शेल्डे येथील त्या जागेला भेट देऊन पाहणी केली. यावेळी या कामाला विरोध करणारे प्रशांत गावस देसाई, पंचसदस्य अमेय चिमूलकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी प्रशांत गावस देसाई यांनी सदर डोंगर कापणी करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT