Goa News Dainik Gomantak
Video

Video: गोवा किंवा देशात पाकिस्तानच्या समर्थनाथ घोषणाबाजी देण्याचे कोणालाच धाडस नाही, तरुणांनी शांत राहावे; मायकल लोबो

Goa News: बागा येथील सलूनचे दुकान तसेच हडफडे येथील वाईन शॉपीच्या एलईडी डिजिटल बोर्डवर 'पाकिस्तान जिंदाबाद' असे आक्षेपार्ह लिहल्याचे आढळून आले.

Pramod Yadav

म्हापसा: हडफडे तसेच बागा येथे मंगळवारी रात्री दोन आस्थापनांच्या डिजिटल बोर्डवर 'पाकिस्तान जिंदाबाद' असे देशविरोधी घोषणा लिहिलेले फलक झळकले, या प्रकारामुळे परिसरात काहीकाळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. हा धक्कादायक प्रकार असून स्थानिकांनी याप्रकरणी दोषीवर कडक कारवाईची मागणी केली.

या दोन्ही घटनांची गंभीर दखल घेत, गोवा पोलिसांनी संबंधित दुकानमालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याप्रकणी कडक कारवाईचा आदेश दिला आहे. सविस्तर माहितीनुसार, बागा व हडफडे येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

बागा येथील सलूनचे दुकान तसेच हडफडे येथील वाईन शॉपीच्या एलईडी डिजिटल बोर्डवर 'पाकिस्तान जिंदाबाद' असे आक्षेपार्ह लिहल्याचे आढळून आले. हे देशविरोधी फलक झळकल्यानंतर स्थानिक आक्रमक झाले. या प्रकारची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ माहिती देण्यात आली. या घटनेची गंभीरता पाहून, पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती चिधळण्यापूर्वी एलईडी बोर्डचे कनेक्शन तत्काळ कापले.

तसेच, दुकानमालकांविरोधात गुन्हे नोंद केले. कळंगुट व हणजूण या दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये स्वतंत्र बीएनएसच्या कलम १५२ व ६१(२) व आयटी कायद्याच्या कलम ६६सी व ६६एफ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याप्रकरणी पुढील चौकशी सुरु आहे. लिसांनी दोन्ही दुकान चालविणाऱ्यांना ताब्यात घेतले. तसेच एलईडी बोर्डचे कनेक्शन बंद केले. एलईडी सिस्टीम हॅक केली असावा, असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात असला तरी याप्रकरणी पोलिस सर्व बाजूने तपास करीत आहेत.

गोवा किंवा देशात, पाकिस्तानच्या समर्थनाथ घोषणाबाजी देण्याचे कोणालाच धाडस नाही. घडलेला प्रकार निंदनीय तसेच मुद्दामहून सांप्रदायिक तणाव तसेच लोकांमध्ये धार्मिक तेड निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. बागा व हडफडे येथे हे प्रकार घडले. तसेच, युवकांनी सजग राहावे व अकारण कोणीही चिथावणीला बळी पडू नये. सिस्टीम हॅक केल्याने हा प्रकार घडला आहे. मात्र, काहीजण या घटनेवरुन स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करताहेत, आपण संबंधित दुकान मालकांना सायबर पोलिसांकडे तक्रार देण्यास सांगितली आहे, असे मायकल लोबो म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: खाकी वर्दीचा धाक दाखवून वृद्धांना लुटायचे, डिचोलीत तोतया पोलिसांच्या टोळीचा पर्दाफाश! दोघे अटकेत

Ruturaj Gaikwad Century: ऋतुराज गायकवाडचं वादळ! गोव्याविरुद्ध झळकावलं शानदार शतक; बनला 'विजय हजारे ट्रॉफी'चा नवा 'सेंच्युरी किंग'

झारखंड दारु घोटाळा! छत्तीसगडच्या मद्य व्यावसायिक नवीन केडियाला गोव्यातून अटक; ACB ची कारवाई

"26 वर्षे देशाची सेवा केली, आता ओळख विचारताय?" निवडणूक आयोगाच्या नोटिसमुळे खासदार विरियातो संतापले

WPL 2026: गोमंतकीय क्रिकेटरचा ‘डब्ल्यूपीएल’मध्ये कल्ला! दिल्ली कॅपिटल्सला ठोकला रामराम; यूपी वॉरियर्ससोबत नवीन इनिंग

SCROLL FOR NEXT