Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
Video

'सरकार लोकांक घरा नोकऱ्या हाडून दिवपाक शकना'; सीएम डॉ.प्रमोद सावंत Video

युवकांनी केवळ सरकारी नोकरीच्या मागे न लागता अगोदर विविध आस्थापनांनी उपलब्ध असलेल्या नोकरीच्या संधीचा लाभ घ्यावा; प्रमोद सावंत.

Pramod Yadav

डिचोली: खासगी कंपन्या आदी विविध आस्थापनांमध्ये नोकऱ्या उपलब्ध असतात. मात्र, सरकारी नोकरीच हवी, या हट्टापायी खासगी नोकऱ्यांसाठी बेरोजगार युवक पुढे येत नाहीत. त्यांच्यात अनास्था दिसून येत आहे, अशी खंत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त करुन सरकार कोणालाही घरबसल्या नोकरी देऊ शकत नाही. त्यासाठी बेरोजगार युवकांनी रोजगार भरती मेळाव्यात सहभागी व्हायला हवे, असेही सांगितले.

युवकांनी केवळ सरकारी नोकरीच्या मागे न लागता अगोदर विविध आस्थापनांनी उपलब्ध असलेल्या नोकरीच्या संधीचा लाभ घ्यावा. आणि त्यानंतरच पुढच्या भवितव्याचा विचार करावा. युवकांनी आपल्यातील कौशल्य विकसित करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

डिचोलीत आयोजित केलेल्या 'रोजगार भरती' मेळ्याचे (जॉब प्लेसमेंट फेर) उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. सेवा पंधरवड्यानिमित्त सोमवारी येथील छत्रपती शिवाजी महाराज सरकारी शाळा संकुलात कौशल्य विकास संचलनालयातर्फे हा रोजगार भरती मेळावा आयोजित केला होता.

याप्रसंगी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, कौशल्य विकास संचालक एस. गावकर आणि उद्योजक हरीश मेलवानी उपस्थित होते.

43 कंपन्यांचा सहभाग

डिचोलीत आयोजित केलेल्या रोजगार भरती मेळ्ळ्यात ४३ कंपन्यांनी सहभाग घेतला होता. या आस्थापनांनी मिळून ३५२ नोकऱ्या उपलब्ध आहेत. या रोजगार भरती मेळाव्यात डिचोली आणि होंडा येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील मिळून १०० हून अधिक प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. या प्रशिक्षणार्थीच्या विविध आस्थापनांकडून मुलाखती घेण्यात आल्या

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बागातील 'त्या' प्रकाराबाबत उत्कंठा वाढली! क्राईम ब्रँचकडून गुन्ह्याची नोंद; व्हिडिओतील टोळक्यापर्यंत पोलिस पोहोचले

VIDEO: "नुसते फटके मारुन चालत नाही!" बाबर आझमचा 'स्लो' खेळ अन् 'फास्ट' उत्तर; सोशल मीडियावर फुटले वादाला तोंड

Bihar Food Poisoning: सत्यनारायणाचा प्रसाद ठरला जीवघेणा! मुजफ्फरपूरमध्ये 100 हून अधिक जणांना अन्नातून विषबाधा; एकाच वेळी अख्खं गाव पडलं आजारी

IPL 2026 Points Table : राजस्थानला नमवून SRH चा गुणतालिकेत धमाका! मोठ्या उलटफेरासह टॉप-5 मध्ये एन्ट्री; मुंबई, चेन्नई आणि कोलकाताची अवस्था बिकट

IPL 2026: उष्णतेचा आयपीएल खेळाडूंवर परिणाम; रोहित शर्मा, विराट कोहली यांनाही त्रास; वाढत्या आर्द्रतेचा फटका

SCROLL FOR NEXT