Velguem House Fire Dainik Gomantak
Video

Velguem Fire: वेळगे सत्तरी घर उज्यांत; Video

Velguem House Fire: गावकऱवाडा-वेळगे येथे शनिवारी संध्याकाळी रुक्मिणी बोम्बडो गावडे यांच्या घराला संध्याकाळी ५.३० च्या सुमारास अचानक आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Sameer Panditrao

गावकऱवाडा-वेळगे येथे शनिवारी संध्याकाळी रुक्मिणी बोम्बडो गावडे यांच्या घराला संध्याकाळी ५.३० च्या सुमारास अचानक आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, घर कौलारू असल्याने आगीने क्षणात रौद्र रूप धारण केले. याची माहिती मिळताच वाळपई अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. घरातील दोन गॅस सिलिंडर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात दलाला यश आले. मात्र घरातील बहुतेक साहित्य जळून खाक झाले. रुक्मिणी या आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने घर जळाल्याने त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आगीत झालेले नुकसान आणि वाचवलेले साहित्य यांचा तपशील अद्याप जाहीर केलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: थंडीत मरण्यासाठी उंच पर्वतावर सोडलं, फोन सायलेंट केला, ब्लँकेटही दिलं नाही; गिर्यारोहक बॉयफ्रेंडनं गर्लफ्रेंडला मारलं? काय नेमकं प्रकरण?

Indigo Flights: मोपा विमानतळावर 8 तर दाबोळीत 9 विमाने रद्द; इंडिगोच्या गोंधळामुळे मुंबई, दिल्लीसह प्रमुख शहरांचे प्रवास ठप्प

Goa Nightclub Fire: नाईट क्लब दुर्घटना प्रकरणात 'पाचवी' अटक, भरत कोहलीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; मालकाचा शोध सुरु

रो दे, रो दे... विराट कोहलीने कुलदीप यादवची उडवली खिल्ली, ड्रेसिंग रूममधील Video Viral

Goa Live News: भाजप उमेदवार रघुवीर कुंकळकर यांनी उमेदवारी अर्ज भरला; मंत्री बाबूश मॉन्सेरात यांची खास उपस्थिती

SCROLL FOR NEXT