शहरात लागलेल्या दोन भीषण आगीमुळे व्यापारीवर्गावर दुःखाचा डोंगर कोसळला. टिळक मैदानाजवळ रात्री साडेदहाच्या सुमारास पहिली आग लागली. वाहनांच्या सुट्या भागांच्या दुकानाला लागलेल्या आगीत दुकान जळून खाक झाले, तर जवळ उभी असलेली दोन वाहनेही नुकसानग्रस्त झाली. या घटनेनंतर दुर्दैवाने बुधवारी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास रविवार बाजारपेठेत दुसरी आग लागली.
या आगीत ८८ दकाने भस्मसात झाल्याची माहिती आहे. रस्त्यावर दुकाने थाटून उदरनिर्वाह करणाऱ्या व्यावसायिकांना या आगीचा मोठा फटका बसला. दुकानांतील मालासह त्यांच्या उपजीविकेचा आधारही आगीत नष्ट झाला. अनेक जण हतबल होऊन अश्रू ढाळताना दिसले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न केले. पोलिसांनीही परिस्थिती हाताळली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.