Valpoi Hit And Run Dainik Gomantak
Video

Valpoi Hit And Run: लिफ्ट जीवावर बेतली; वाळपईत महिलेचा अपघातात मृत्यू

Goa Accident: रेडिघाट येथील गणेश मंदिराजवळ शुक्रवारी सकाळी भीषण अपघात घडला. मद्यधुंद ट्रकचालकाने स्कूटरला जोरदार धडक दिल्यामुळे वनिता मोर्लेकर पोकळे या महिला सुरक्षा रक्षकाचा जागीच मृत्यू झाला.

Sameer Amunekar

वाळपई : रेडिघाट येथील गणेश मंदिराजवळ शुक्रवारी सकाळी भीषण अपघात घडला. मद्यधुंद ट्रकचालकाने स्कूटरला जोरदार धडक दिल्यामुळे वनिता मोर्लेकर पोकळे या महिला सुरक्षा रक्षकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात स्कूटरचालक गणेश बेतकेकर हा जखमी झाला असून त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.

धडकेनंतर मद्यधुंद चालक ट्रकसह पसार झाला. मात्र, जागरूक नागरिकांनी त्याचा पाठलाग करून पकडले आणि बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. वनिता मोर्लेकर पोकळे (वय ४० वर्षे) या मूळच्या कोपार्डे येथील असून लग्नानंतर देसाईनगर-साखळी येथे राहात होत्या.

त्यांना ६ वर्षांचा मुलगा आहे. अपघातानंतर १०८ रुग्णवाहिकेने त्यांना वाळपई इस्पितळात आणण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठविला आहे. या प्रकरणाचा तपास वाळपई पोलिस करीत आहेत.

बस नसल्याने लिफ्ट घेतली अन्...

वनिता या वाळपई इस्पितळात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होत्या. शुक्रवारी सायंकाळी ८ वाजता ड्यूटी संपवून त्या साखळी येथे घरी परतण्यासाठी निघाल्या. मात्र, रात्री बसची सोय नसल्याने त्या बेतकेकर यांच्या दुचाकीवरून साखळीकडे येत होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अस्नोड्यात ओव्हरटेकिंगच्या वादातून राडा; दुचाकीस्वाराला बेदम मारहाण! भररस्त्यात घडलेला थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Nepal Jeep Accident: नेपाळमध्ये भीषण अपघात! भाविकांची जीप 700 मीटर खोल दरीत कोसळली; 20 जणांचा जागीच मृत्यू

Goa Karnataka Island Dispute: गोव्याने आपली हक्काची बेटे कशी गमावली?

संयुक्त अरब जागृती! - संपादकीय

US Iran War: अखेर युद्ध थांबलं! ट्रम्प प्रशासनाची मोठी घोषणा, पण घातली 'ही' कडक अट

SCROLL FOR NEXT