Goa water pollution Dainik Gomantak
Video

Valpoi News: वाळपई शहरातून वाहणारी नदी प्रदूषित; सत्तरीतील नागरिकांची कचरा न टाकण्याची विनंती

Valpoi river pollution: सत्तरी भागात म्हादई नदीला जाऊन मिळणारी नदी वाहते, मात्र लोकांनी पसरवलेल्या कचऱ्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे

Akshata Chhatre

वाळपई: सत्तरी भागात म्हादई नदीला जाऊन मिळणारी नदी वाहते, मात्र लोकांनी पसरवलेल्या कचऱ्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. ही नदी जर का अशीच प्रदूषित होत राहिली तर गावांमध्ये नदीचं पाणी पिणाऱ्या स्थानिकांना त्रास सहन करावा लागू शकतो अशी भीती व्यक्त केली जातेय. काही लोकं या नदीच्या पात्रात प्लास्टिक बॅग, राहिलेल्या वस्तू, जुनं सामान, फुलं अशा कित्येक गोष्टी आणून टाकतायत हे जर का असंच सुरु राहिलं तर येणाऱ्या काळात नदीची स्थिती आणखीन बिकट होईल अशी भीती व्यक्त केली जातेय.

सत्तरीतील मासोर्डे या गावातील गौरेश गावस तसेच कृष्णा गावास नावाच्या स्थानिकांनी माध्यमांशी संवाद साधला. झर्मे गावातून होणाऱ्या या नदीचा उगम गावांमधून जात म्हादई नदीला मिळतो मात्र स्थानिकांकडून केल्या जाणाऱ्या अशा गैरप्रकारांमुळे नदीच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. वाळपई नगरपालिकडेने यात वेळीच लक्ष घालूं प्रश्न सोडवावा तसेच लोकांनी नदीत कचरा टाकण्याची चूक करू नये अशी मागणी स्थानिक करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cutbona Jetty: कुटबण जेटीवर SOP लागू! मच्छीमारांना सतर्क राहण्याचे आवाहन; कामगारांची तपासणी सुरू

Bhausaheb Bandodkar: गोवा मुक्त होण्यापूर्वी, अनेक भागांत ‘भाऊसाहेब’ हे नाव लोकप्रिय होते..

David Warner: डेव्हिड वॉर्नरची 'कमाल', 'या' बाबतीत विराटला टाकलं मागे; आता शोएब मलिकच्या विक्रमावर डोळा

Ganesh Chaturthi: 'तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता'! आगमनाची तयारी सुरु; माटोळी, वाद्ये, नैवेद्यासाठी बाजारात गर्दी

Goa Crime: 3 सख्या बहिणींवर पाच वर्षांपासून लैंगिक अत्याचार; रक्षाबंधनाच्या दिवशीच प्रकरण उघड

SCROLL FOR NEXT