Goa Unseasonal Rain Dainik Gomantak
Video

Unseasonal Rain Goa: वाळपईला अवकाळी पावसाने झोडपले, झाडांचीही पडझड

Goa Weather Update: वाळपईसह सत्तरीतील अनेक भागांत अचानक जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

Sameer Amunekar

वाळपई: हवामान खात्याने पावसाची शक्यता दर्शवली असतानाच आज दुपारी २.३० च्या सुमारास वाळपईसह सत्तरीतील अनेक भागांत अचानक जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यावेळी काही प्रमाणात विजेचा गडगडाट होत होता. दुपारच्या वेळी अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे नागरिकांची पुरती तारांबळ उडाली.

नाणूस-वाळपई येथे जोरदार वाऱ्यामुळे रस्त्यावर झाड पडल्याची घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून सत्तरीच्या काही भागांत अधून मधून पाऊस पडत होता. तसेच उष्माही खूप वाढला होता. या वाढत्या उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले होते.

शनिवारी (०५ एप्रिल) सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते आणि दुपारी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केलं असलं तरी अनेक ठिकाणी झाडांची पडझड पाहायला मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT