Tiger in Dodamarg Dainik Gomantak
Video

Tiger in Dodamarg: म्हादईतील वाघाचे दोडामार्गात भ्रमण? महाराष्ट्र, गोवा सीमेलगत वाढला वावर

Tiger Sighted: दोडामार्ग तालुक्यातील हडफडे भागातील जंगल परिसरात हा वाघ भ्रमण करताना तेथील वन्यजीव अभ्यासकांच्या निदर्शनास आला आहे.

Sameer Panditrao

डिचोली: महाराष्ट्र व गोवा सीमेलगतच्या दोडामार्ग परिसरात पट्टेरी वाघाचा संचार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोडामार्ग तालुक्यातील हडफडे भागातील जंगल परिसरात हा वाघ भ्रमण करताना तेथील वन्यजीव अभ्यासकांच्या निदर्शनास आला आहे.

दरम्यान, दोडामार्ग भागात दर्शन दिलेला हा पट्टेरी वाघ म्हादई अभयारण्यातील आहे, असा दावा पर्यावरण अभ्यासकांनी केला आहे. गोव्यातील पर्यावरणप्रेमी आणि वन्यजीव अभ्यासक राजेंद्र केरकर यांनीही तसा ठाम दावा केला आहे.

चार दिवसांपूर्वी म्हणजेच गेल्या शुक्रवारी जंगल परिसरातून भ्रमंती करताना वन्यजीव अभ्यासक दर्शन वेंगुर्लेकर आणि त्याच्या साथीदारांना वाघ भ्रमण करताना आढळून आला. गेल्या मार्च महिन्यातही वाघाचे दर्शन झाले होते, अशी माहिती मिळाली आहे.

सिंधुदुर्ग भागात वाघ असणे ही निसर्ग संवर्धनाच्यादृष्टीने समाधानकारक बाब आहे. समृद्ध जंगलातच वाघाचा संचार असतो. असा वन्यजीव अभ्यासकांचा दावा आहे. दरम्यान, गोव्यासह महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने व्याघ्र संवर्धनासाठी संयुक्तपणे पुढाकार घ्यावा, अशी मागणी गोव्यातील पर्यावरण आणि वन्यजीव अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी केली आहे.

वाघ म्हादई अभयारण्यातील

दोडामार्ग येथील जंगल परिसरात आढळून आलेला वाघ म्हादई अभयारण्यातील आहे. महाराष्ट्रातील वन्यजीव अभ्यासक आणि तज्ज्ञांशी संपर्क करून माहिती मिळवली असता हा वाघ म्हादई अभयारण्यातील असल्याचे स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रातील डेटा बेसमध्ये या वाघाविषयी माहिती उपलब्ध नाही. सावंतवाडी ते दोडामार्ग भागात वाघांचे अस्तित्व आहे. आंबेली ते तिळारीपर्यंतच्या भ्रमण मार्गात एकूण आठ वाघ आहेत. वाघ एकाचवेळी ५० किलोमीटर पर्यंत भ्रमण करतात. असे वन्यजीव अभ्यासक प्रा. राजेंद्र केरकर यांनी सागितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT