Vijay Kenkre Kala Academy Dainik Gomantak
Video

Kala Academy: 'कला अकादमी'चे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची गरज, टास्क फोर्सची मागणी; मुख्यमंत्र्यांचे मात्र मौन

Kala Academy Task Force: अहवालाद्वारे सूचित केलेल्या दुरुस्त्या लवकर कराव्यात, याकरिता पुन्हा एकदा मुख्यमंत्री सावंत यांना भेटून मागणी करण्याचा निर्णय टास्क फोर्सने घेतल्याचे केंकरे यांनी सांगितले.

Sameer Panditrao

Task Force Vijay Kenkare About Kala Academy

पणजी: कला अकादमीच्या नूतनीकरणात आढळलेल्या चुकांविषयीचा तपासणी अहवाल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दिल्यानंतरही त्यावर आवश्यक ती पावले उचलली गेली नाहीत.

त्यामुळे अजूनही अकादमीच्या कामांविषयी सुचविलेल्या दुरुस्त्या झाल्या नसल्याने टास्क फोर्सने शनिवारी पुन्हा एकदा विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. राज्य सरकारला अहवालाद्वारे सूचित केलेल्या दुरुस्त्या लवकर कराव्यात, याकरिता पुन्हा एकदा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना भेटून मागणी करण्याचा निर्णय टास्क फोर्सने घेतल्याचे केंकरे यांनी सांगितले.

‘टास्क फोर्स’चे अध्यक्ष केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी मनोरंजन सोसायटीच्या परिषद कक्षात बैठक पार पडली. यावेळी टास्क फोर्सचे सदस्य, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते, कला व संस्कृती खाते आणि कला अकादमीचे अधिकारी तसेच कंत्राटदार उपस्थित होते.

बैठक संपल्यानंतर पत्रकारांना माहिती देताना केंकरे म्हणाले, कला अकादमीच्या नूतनीकरणाविषयी मागील वर्षी (ऑक्टोबरमध्ये) टास्क फोर्सने केलेल्या तपासणीनंतर तो अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला होता. नूतनीकरणात ज्या चुका आढळून आल्या, त्याचे सखोल निरीक्षण या अहवालात नोंदविले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ध्वनी योजना, प्रकाश योजनेमध्ये काही चुका आहेत आणि त्या दूर करणे अत्यंत आवश्यक आहेत.

शिवाय जे इंटिरियर केले आहे, त्यातही चुका आढळल्या आहेत. या सर्व चुका दुरुस्त करता येऊ शकतात. टास्क फोर्सचा तपासणी अहवाल मुख्यमंत्र्यांना दिल्यानंतर त्यावर ज्या गतीने पावले उचलायला हवी होती, ती उचलली नाहीत, असेही केंकरे म्हणाले. शिवाय अकादमीचे स्ट्रक्चरल ऑडिट चेन्नईच्या ‘आयआयटी’मार्फत करून घ्यावे, असे आम्ही सरकारला सूचित केले असल्याचे त्यांनी नमूद केले.

टास्क फोर्सने ज्या चुका दाखविल्या होत्या, त्या अजूनही दूर झालेल्या नाहीत. ध्वनी व प्रकाश योजना करणारे कंत्राटदार, तज्ज्ञ आणि सल्लागारांशी आम्ही चर्चा करणार आहोत. दोन-अडीच महिने झाले तरी काहीच कामे पुढे गेलेली नाहीत. त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. मुख्यमंत्र्यांनीच टास्क फोर्स समिती नेमली ती नूतनीकरणाच्या कामात समस्या आढळल्यामुळेच. त्यामुळे राहिलेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे या बाबी मांडल्या पाहिजेत. त्यासाठी दोन पानांचे निवेदन त्यांना देणार आहोत, असेही यावेळी समिती सदस्यांनी सांगितले.

खुल्या रंगमंचाकडेही दुर्लक्षच!

कला अकादमी पूर्वी जशी होती तशी नाही. अकादमीच्या खुल्या रंगमंचाविषयी कोणीही काहीही बोलत नाही. त्याचा काही भाग यापूर्वी कोसळला होता. तो अकादमीचाच एक भाग आहे. त्याचे काय होणार, हेही पाहायला हवे, असे केंकरे म्हणाले. कला अकादमीमध्ये येऊन नाटक सादर करणाऱ्या अनेक स्थानिक नाट्य संस्था आहेत. थिएटर समूहांनी अकादमीत नाटक सादर केल्यानंतर त्याचा जो परिणाम होणे आवश्यक आहे, तो परिणाम होत नाही हे लक्षात घ्यावे. टास्क फोर्स समिती काहीतरी काम करीत आहे आणि आवश्यक ती कामे गतीने होण्यासाठी या नाट्य संस्थांनी फोर्सला पाठिंबा द्यावा, अशी विनंती केंकरे यांनी केली.

मुख्यमंत्र्यांचे मौन

टास्क फोर्सची आज तिसरी बैठक पार पडली. या बैठकीत दोन-अडीच महिन्यांपूर्वी दिलेल्या अहवालावर चर्चा करण्यात आली. त्यात सरकारच्या वेळकाढू धोरणाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. पणजीतील एका कार्यक्रमास उपस्थित राहिलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना या अनुषंगाने विचारणा केली असता, त्यांनी त्यावर भाष्य करणे टाळले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT