Taleigao Fire Incident Dainik Gomantak
Video

Taleigao Fire: ही आग लागते कुठून? सलग दुसऱ्या घटनेनंतर ताळगाववासीय चिंताग्रस्त; पिके-झाडे जाळून खाक

Taleigao Fire Incident: दोन दिवसांपूर्वी ताळगावातील शेतातील गवताला आग लागण्याची घटना ताजी असतानाच सुमास पुन्हा गवताला आग लागून भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Sameer Panditrao

पणजी: दोन दिवसांपूर्वी ताळगावातील शेतातील गवताला आग लागण्याची घटना ताजी असतानाच बुधवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास पुन्हा गवताला आग लागून भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही आग मोठ्या प्रमाणात फैलावण्यापूर्वीच अग्निशमन दलाच्या जवानांनी तसेच तेथील स्थानिक लोकांनी विझविण्यास मदत केल्याने ती सुमारे एका तासानंतर आटोक्यात आणण्यात यश आले. वारंवार लागणाऱ्या या शेतातील आगीमुळे आजूबाजूला निवासी संकुलामधील लोकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. गवताला ही आग लागण्यामागील कारणे काय, हेही एक कोडेच आहे.

ही आग रस्त्यापासून बरीच आतमध्ये शेतजमिनीतील गवताला लागल्याने त्या ठिकाणी पाण्याचा बंब नेणे अशक्य होते. त्यामुळे या बंबामधील पाणी तसेच शेतामध्ये असलेल्या विहिरीतील पाणी बादल्यांमधून भरून आग लागलेल्या ठिकाणी नेण्यासाठी दलाच्या जवानांनी तसेच काही ग्रामस्थानी मदत केली. सुमारे एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. मात्र, या आगीमुळे तेथील केळींच्या झाडानाही झळ बसली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT