Subhash Shirodkar About Cooperative Banks Dainik Gomantak
Video

Subhash Shirodkar: यापुढे सोसायटी व बॅंकला डबघाईस येऊ देणार नाही : मंत्री शिरोडकर

Subhash Shirodkar: यापुढे कुठलीच बॅंक डबघाईस येऊ न देण्यासाठी काही महत्त्‍वाचे बदल लवकरात लवकर करण्याचा विचार आहे, असे सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Subhash Shirodkar About Cooperative Banks

पणजी: सहकार क्षेत्रात प्रामाणिकपणाला महत्त्‍व आहे. ग्रामीण भागाचा विकास खऱ्या अर्थाने सहकार क्षेत्रामुळे झाला आहे. अनेक सोसायट्या, अर्बन बँकांमुळे लोक सहकार क्षेत्राशी जोडले गेले आहेत. परंतु दुर्दैवाने म्हापसा अर्बन, मडगाव अर्बन, व्हिजिनरी, अष्टगंधा व माशेल महिला अर्बनसारख्या सोसायट्या व बॅंका डबघाईस आल्या. या पुढे कुठलीच बॅंक डबघाईस येऊ न देण्यासाठी काही महत्त्‍वाचे बदल लवकरात लवकर करण्याचा विचार आहे, असे सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.

मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत शिरोडकर बोलत होते. त्‍यांनी सांगितले की, सहकार रत्न पुरस्काराला एकही नाव न आल्याने यंदा हा पुरस्‍कार देण्‍यात आलेला नाही. सहकार क्षेत्रातील देण्यात येणाऱ्या या पुरस्कारांमध्ये ‘सहकार भूषण’साठी रोख ७५ हजार आणि ‘सहकार श्री’साठी ५० हजारांचे रोख पारितोषिक दिले जाईल. ‘सहकार रत्न’साठी अर्जच न आल्याने १.२५ लाखांचे बक्षीस खात्याकडेच राहणार आहे. दरम्‍यान, सहकार क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या गौरी शिरवईकर व गोविंद नाईक यांनाही वैयक्तिक गटात पुरस्कार जाहीर झाले आहेत असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"गोव्यातली गुंडगिरी मुळासकट संपवणार" काणकोणकर हल्ल्यानंतर CM सावंतांचा Action Mode

भारतासोबत युद्ध झाल्यास सौदी पाकिस्तानला मदत करणार का? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफने काय उत्तर दिलं पाहा Video

सात दिवसांत मास्टरमाईंडचे नाव समोर न आल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देणार; मंत्री तवडकरांच्या नावाने व्हायरल होतोय फेक मेसेज

Vagator: 'सगळे पाणी हॉटेल्सना जातेय, आम्हाला काय'? वागातोर ग्रामस्थांची ‘पेयजल’च्या कार्यालयावर धडक; गैरव्यवस्थापन थांबवण्याची मागणी

Goa Live Updates: मंत्री तवडकरांची पुन्हा गावडेंवर टीका

SCROLL FOR NEXT