Kodli to Ponda Bus Service Issue Dainik Gomantak
Video

Ponda: विद्यार्थ्यांसाठी दररोजची कसरत! कोडली-फोंडा मार्ग अजूनही बसविना

Kodli to Ponda Bus Service: कोडली ते फोंडा या मार्गावर गेल्या काही काळापासून कोणतीही सार्वजनिक बससेवा उपलब्ध नाही. यामुळे विशेषतः शाळा आणि कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजच्या प्रवासात गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Sameer Amunekar

फोंडा: कोडली ते फोंडा या मार्गावर गेल्या काही काळापासून कोणतीही सार्वजनिक बससेवा उपलब्ध नाही. यामुळे विशेषतः शाळा आणि कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजच्या प्रवासात गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बससेवा सुरू करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी एक वर्षापूर्वीच संबंधित विभागाला लेखी पत्र दिले होते. मात्र आजतागायत कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.

या मार्गावर शासकीय परिवहन म्हणजेच कदंब बससेवा पूर्णपणे बंद असल्यामुळे, विद्यार्थी, नोकरदार आणि वयोवृद्ध नागरिक यांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावं लागत आहे. अनेक वेळा विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोहोचणं कठीण होतं, तर काहींना 5-6 किमी अंतर चालत जावं लागतं. पावसाळ्यात आणि उन्हाच्या कडाक्यात ही परिस्थिती अधिकच त्रासदायक ठरते.

“एक वर्ष उलटून गेलं तरी आमच्या मागणीचा काहीच विचार झालेला नाही. सकाळी ७ वाजेपर्यंत तरी किमान एक कदंब बस सोडावी, ही आमची मागणी आहे,” असं स्थानिकांनी सांगितलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zuari Bridge Car Accident: झुआरी पुलावर बीएमडब्ल्यू कारचा अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

भिवपाची गरज आसा! गोव्यात कामगारांची पिळवणूक; विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदानावर एकवटले

Hydroponic Farming: हायड्रोपोनिक्स! मातीविरहित शेती शिका, घरच्याघरी भाज्या मिळवा..

Video: गोरीलाला फुटला मायेचा पाझर! बाळाला आईच्या स्वाधीन केलं; भावूक करणारा व्हिडीओ

Goa News: पर्रा खून प्रकरण, आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT