Shri Shantadurga Kunkolikarin Jatra Dainik Gomantak
Video

Shantadurga Jatra 2025: श्री शांतादुर्गा कुंकळ्‍ळीकरीण देवस्थानाचो जत्रोत्सव 25 ते 30 डिसेंबर मेरेन Video

Shri Shantadurga Kunkolikarin Jatra: पौष शुद्ध पंचमी (२५ डिसेंबर) पासून हा जत्रोत्सव सुरू होत असून त्या दिवशी सकाळी देवीचा महाभिषेक व रात्री १२ वांगड्यांच्या उपस्थितीत विधिपूर्वक नमन घालून या उत्सवाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर शिबिकोत्सव आणि जागर होणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्‍ळीकरीण देवस्थानचा जत्रोत्सव गुरुवार २५ डिसेंबरपासून सुरू होणार असून ३० डिसेंबर रोजी महारथ मिरवणुकीनंतर या उत्सवाची सांगता होणार आहे. या पाच दिवसांत लाखो भाविक या जत्रोत्सवात सामील होणार असून भाविकांसाठी ती एक पर्वणी ठरेल.

श्री शांतादुर्गा कुंकळ्‍ळीकरीण देवस्थान समितीचे अध्यक्ष विनोद यशवंत देसाई यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी सचिव गुणेश  गोपीनाथ देसाई, खजिनदार महेन्द्र प्रभाकर देसाई तसेच मुखत्यार बोंबों नारायण देसाई हे उपस्थित होते.

पौष शुद्ध पंचमी (२५ डिसेंबर) पासून हा जत्रोत्सव सुरू होत असून त्या दिवशी सकाळी देवीचा महाभिषेक व रात्री १२ वांगड्यांच्या उपस्थितीत विधिपूर्वक नमन घालून या उत्सवाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर शिबिकोत्सव आणि जागर होणार आहे.

२६ डिसेंबर रोजी रात्री देवीची अंबारी रथातून, २७ डिसेंबर रोजी फुलांच्या रथातून तर २८ रोजी विजय रथातून मिरवणूक होणार आहे. २९ रोजी रात्री जागर व शिबिकोत्सव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ३० डिसेंबर रोजी पहाटे सहा वाजता महारथातून मिरवणूक होणार असून हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक फातर्पा येथे जमणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MS Dhoni Jersey Number 7: थालाचा नवा अवतार! 7 नंबरची जर्सी बदलून धोनी रचणार नवा इतिहास? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Zodiac Personality Traits: गप्प बसतात पण सगळा हिशोब ठेवतात! 'या' 6 राशींचे लोक चालते-फिरते डिटेक्टिव्ह; चुटकीसरशी ओळखतात शत्रूचा डाव

Iran Israel War: मृत्यूच्या दाव्यानंतर काही क्षणातचं इराणच्या सर्वोच्च सुरक्षा प्रमुखाचं ट्विट! इस्रायलचा दावा खोटा की तेहरानचा 'माइंड गेम'?

VIDEO: 'लाईफ इज ब्युटीफुल इन गोवा!' हरमनप्रीत कौर अन् पेलेचा व्हिडिओ व्हायरल; किनाऱ्यावर रंगली गप्पांची मैफल

Pilgao: सफर गोव्याची! म्हादई समुद्राला मिळण्यापूर्वी लागणारे, छोटेसे टुमदार 'पिळगाव'

SCROLL FOR NEXT