Sanquelim Hit and Run Dainik Gomantak
Video

Sanquelim Hit and Run: साखळीत 'हिट अँड रन'मध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू; पोलिसांकडून आरोपी आणि कार ताब्यात

Hit and Run Case: हिट अँड रन अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल बुधवारी (५ मार्च) घडली आहे.

Sameer Amunekar

साखळी: हिट अँड रन अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल बुधवारी (५ मार्च) घडली आहे. आदर्श प्रभाकर मुरगुड (28) असं मृत तरुणाचं नाव आहे. अज्ञात वाहनानं जोरदार धडक दिल्यानंतर आरोपी चालक घटनास्थळावरून फरार झाला. बेळगाव येथील आदर्श प्रभाकर मुरगुड हा तरुण आपल्या दुचाकीवरून डिचोली येथून साखळीच्या दिशेनं जात असताना समोरून येणाऱ्या कारनं त्याच्या दुचाकीला धडक दिली.

अपघातात दुचाकीचालक आदर्श गंभीर जखमी झाला, त्याला तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. या अपघातानंतर मदत करण्याऐवजी कारचालकानं घटनास्थळावरून पळ काढला.डिचोली पोलिसांनी घटनेचा तपास करत फरार कारचालकाला कारसह ताब्यात घेतलं आहे. समीर मधुकर पाटील असं ताब्यात घेतलेल्या कारचालकचं नाव आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT