Sankhali Tripurari Poornima Dainik Gomantak
Video

Sankhali Tripurari Poornima: हजारो दिव्यांनी उजळले वाळवंटीचे पात्र! साखळीत त्रिपुरारी पौर्णिमेचा जल्लोष

Tripurari Poornima Celebration: दीपावलीच्या प्रकाशोत्सवानंतर आता त्रिपुरारी पौर्णिमेच्या झगमगाटाने साखळी आणि परिसर झळाळून गेला.

Sameer Amunekar

साखळी : दीपावलीच्या प्रकाशोत्सवानंतर आता त्रिपुरारी पौर्णिमेच्या झगमगाटाने साखळी आणि परिसर झळाळून गेला. विठ्ठलापूर येथे कला व संस्‍कृती खाते, पर्यटन विकास महामंडळ, दीपावली उत्सव समिती व श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवात भक्ती, संगीत आणि प्रकाशाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

रात्री श्रीकृष्णाची दिमाखदार मिरवणूक दिंडी पथकाच्या गजरात निघाली. ‘जय जय विठ्ठल’च्या घोषात, टाळमृदुंगांच्या नादात गावातील वातावरण भक्तिभावाने भारावून गेले. मिरवणुकीचा थाट पाहण्यासाठी विठ्ठलापूरच्या गल्लीबोळांतून लोकांनी गर्दी केली होती.

वाळवंटी नदीच्या पात्रात मध्यभागी श्रीकृष्णाची मूर्ती स्थानापन्न करण्यात आली आणि त्या क्षणी महिलांकडून दीपदान सुरू झाले. हजारो दिव्यांच्या प्रकाशाने वाळवंटीचे पात्र जणू सुवर्णसरितेप्रमाणे झळाळून गेले. दिव्यांच्या प्रतिबिंबात पाण्यावर निर्माण झालेली प्रकाशरेषा हा दृश्यानुभव उपस्थितांच्या स्मरणात कायम राहील असा होता.

रात्री आठ वाजताच श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या परिसरात नौकानयन स्पर्धेची रंगत वाढली. रंगीबेरंगी दिव्यांनी सजवलेल्या नौका, पाण्यावर तरंगणाऱ्या दीपांच्या साथीने जणू जिवंत चित्र वाटत होत्या. स्पर्धकांनी आपल्या सजवलेल्या नौकांमधून कला, श्रद्धा आणि सर्जनशीलतेचा मेळ घालून रसिकांची मने जिंकली.

मंदिराच्या बाजूस खास उभारलेल्या रंगमंचावर ‘आधी देवा विठ्ठला’ हा भक्तिगीतांचा सुरेल कार्यक्रम रंगला. प्रसिद्ध कलाकारांच्या सुमधुर सादरीकरणाने साखळीकर मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाच्या अखेरीस आकाशात फटाक्यांची आतषबाजी करण्‍यात आली. संपूर्ण परिसर भक्तिभावाने उजळून निघाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa: म्हापशातील कोमुनिदाद प्रशासक इमारत कमकुवत, शासनाकडून दखल नाही; कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका

Deported! बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधु बँकॉकमधून डिपोर्ट; दिल्लीतून गोव्यात होणार दाखल, व्हिडिओ आला समोर Watch

अनधिकृत आस्थापन पाडण्याचे आदेश, तरी अंमलबजावणी नाही! 'कारवाई न करण्याचा खेळ' कधी थांबणार?- संपादकीय

विरोधी पक्षांचे नेते 'नर्व्हस' की 'ओवरकॉन्फिडेंट'? स्वार्थासाठी युती तोडली, भाजपला आयती संधी!

Horoscope: नशीब चमकणार! आजचा दिवस 'या' 3 राशींसाठी ठरणार अतिशय शुभ; कारण... आदित्य-मंगल योग

SCROLL FOR NEXT